Join us
Daily Top 2Weekly Top 5

गॅबरिलामुळे नव्हे तर या अभिनेत्याच्या पत्नीमुळे अर्जुन रामपाल आणि मेहेरमध्ये निर्माण झाला दुरावा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 14:26 IST

गॅबरिलाच्या आधी अर्जुनच्या आयुष्यात मेहेर होती. मेहेर आणि अर्जुनला दोन मुली असून त्यांनी काही वर्षांपूर्वी घटस्फोट घेतला.

ठळक मुद्देसुजैन आणि अर्जुन खूपच चांगले फ्रेंड्स होते. पण अर्जुनमुळेच सुजैन आणि हृतिक रोशनचा घटस्फोट झाला असल्याची चर्चा सगळीकडे होत होती.

अर्जुन रामपाल गेल्या काही वर्षांपासून त्याच्या चित्रपटांपेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे. त्याची प्रेयसी गॅबरिला गरोदर असल्याचे त्याने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना सांगितले. गॅबरिला ही साऊथ अफ्रिकन मॉडल असून तिच्यासोबत फोटो शेअर करत त्याने ही गुड न्यूज सगळ्यांना दिली. 

गॅबरिलाच्या आधी अर्जुनच्या आयुष्यात मेहेर होती. मेहेर आणि अर्जुनला दोन मुली असून त्यांनी काही वर्षांपूर्वी घटस्फोट घेतला. अर्जुनने सोशल मीडियाद्वारेच त्यांच्या घटस्फोटाविषयी सगळ्यांना सांगितले होते. अर्जुन आणि मेहेर यांनी 20 वर्षांच्या नात्यानंतर वेगळे व्हायचा निर्णय घेतला. त्यांच्या दोन्ही मुली आता मेहेरसोबत राहातात. अर्जुन आणि मेहेर यांच्या नात्यात 2011 पासूनच दुरावा निर्माण झाला होता. 

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, शाहरुख खानच्या रावण या चित्रपटात काम करण्याची इच्छा असल्याचे अर्जुनने शाहरुखला सांगितले होते. त्यामुळे शाहरुखने अर्जुनला या चित्रपटासाठी विचारले. पण चित्रपट प्रदर्शित व्हायच्या काही दिवस आधी मेहेरने शाहरुखकडे अर्जुनला जास्त पैसे देण्याची मागणी केली. यामुळे मेहर आणि शाहरुखमध्ये भांडणं झाली होती. शाहरुखने मेहेरचा फोन उचलणे देखील बंद केले होते. मेहेर आणि शाहरुखची पत्नी गौरी या एकमेकांच्या खूप चांगल्या फ्रेंड्स होत्या. पण यामुळे तिने देखील मेहेरशी बोलणे बंद केले. त्यानंतर वी आर फॅमिली या चित्रपटाच्या वेळी देखील मानधनावरून अर्जुन आणि करणमध्ये वाद निर्माण झाला होता आणि त्यानंतर करणसोबत काम न करण्याचे अर्जुनने ठरवले. या सगळ्यामुळे अर्जुन आणि मेहेरचे बॉलिवूडमधील अनेकांसोबतचे नाते बिघडले. 

अर्जुन आणि मेहेरच्या आयुष्यात या सगळ्या गोष्टी घडत असतानाच अर्जुन आणि सुजैन खानच्या नात्याची चर्चा मीडियात रंगायला लागली. सुजैन आणि अर्जुन खूपच चांगले फ्रेंड्स होते. पण अर्जुनमुळेच सुजैन आणि हृतिक रोशनचा घटस्फोट झाला असल्याची चर्चा सगळीकडे होत होती. यावरून मेहेर आणि अर्जुनची भांडणं देखील झाली असल्याचे म्हटले जाते. पण सुझैन आणि माझ्यात मैत्रीपेक्षा काहीही जास्त नसल्याचे अर्जुनचे सांगितले होते. मात्र तरीही मेहेरला या गोष्टीवर विश्वास नव्हता. ती घर सोडून तिच्या माहेरी निघून गेली. पण काही काळानंतर त्यांनी आपल्या नात्याला आणखी एक संधी देण्याचे ठरवले. पण पुन्हा अर्जुन आणि सुजैन एकमेकांच्या संपर्कात असल्याचे मेहेरला कळले आणि यावरून 2016 मध्ये त्या दोघांमध्ये प्रचंड भांडणं झाली. यानंतर त्या दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. 

टॅग्स :अर्जुन रामपाल