Join us

सुयश टिळकची पत्नी झळकणार नव्या हिंदी मालिकेत; पोस्ट शेअर करत आयुषीने दिली गुडन्यूज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 17:19 IST

Ayushi bhave: आयुषी भावेने आजवरच्या कारकिर्दीत अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.

गेल्या काही काळात मराठी कलाकारांचा हिंदी मालिका आणि सिनेमांमध्ये जाण्याचा ओघ वाढला आहे. सध्या कुशल बद्रिके, हेमांगी कवी, श्रेया बुगडे यांसारखे कितीतरी मराठी कलाकार हिंदी रिअॅलिटी शो, मालिकांमध्ये काम करत आहेत. तर, यात असेही काही कलाकार आहेत जे गेल्या कित्येक काळापासून हिंदी मालिकांमध्येच रममाण झाले आहेत. यातलीच एक अभिनेत्री म्हणजे आयुषी भावे. आजवरच्या कारकिर्दीत आयुषीने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं असून तिच्या पदरात आणखी एक हिंदी मालिका पडली आहे. आयुषी लवकरच '10:29 की आखरी दस्तक' या हिंदी मालिकेत झळकणार आहे.

आयुषी भावेने आजवरच्या कारकिर्दीत अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे मराठी कलाविश्वात ती चांगलीच लोकप्रिय आहे. अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये झळकल्यानंतर आयुषी पुन्हा एका नव्या कोऱ्या हिंदी मालिकेत झळकणार आहे. '10:29 की आखरी दस्तक' या हिंदी मालिकेत ती महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.

"10:29 की आखरी दस्तक' या मालिकेत आयुषी, बिंदू ही भूमिका साकारणार आहे. या भूमिकेविषयी तिने नुकतंच भाष्य केलं. "मी या नव्या शोमध्ये बिंदूची भूमिका साकारत आहे. या मालिकेत काम करायची संधी मिळाली याचा मला विशेष आनंद होतोय. बिंदू हे पात्र सस्पेन्सने भरलेलं आहे. त्यामुळे मालिका पाहतांना या पात्राचे एक-एक छटा उलगडत जाणार आहे", असं आयुषी म्हणाली.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारसुयश टिळकसेलिब्रिटी