Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुयश टिळक दिसणार वेगळ्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 06:30 IST

झी युवा वाहिनीवर 'एक घर मंतरलेलं' ही थरारक मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

 झी युवा वाहिनीवर 'एक घर मंतरलेलं' ही थरारक मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत सुरुची अडारकर गार्गी महाजन ह्या पत्रकाराची भूमिका निभावत आहे. आता या मालिकेत सुयश टिळकची एंट्री झाली आहे . सुयश आणि सुरुची या दोघांची लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा छोटा पडदा गाजवायला सज्ज झाली आहे.  

सुयश मालिकेत क्षितिज निंबाळकर हे पात्र निभावत आहे. क्षितिज हा एक नामवंत व्यवसायिक असून त्याला दुर्मिळ वस्तू गोळा करण्याचा छंद आहे. त्याचबरोबर अतिशय तर्कशुद्ध विचार करणारा आणि कोणत्याही गोष्टीला न घाबरणारा असा क्षितिज कोणत्याही गोष्टीचा सारासार विचार करून निर्णय घेतो.

मालिकेची कथा 'मृत्युंजय या बंगला आणि या बंगल्याबद्दल असलेल्या अनैसर्गिक गूढ गोष्टींबद्दल असून या दोघांचे या बंगल्याशी काही ना काही कनेक्शन दाखवले आहे  मृत्युंजय बंगला जिथे कोणीही विकत घ्यायला तयार नसताना केवळ अतिशय किरकोळ किमतीला मिळत असल्याने क्षितिज हा बंगला विकत घेतो तर या बंगल्यातील अनैसर्गिक गोष्टींचे गूढ उकलण्याचा प्रयत्न गार्गी (सुरुची अडारकर) करत आहे. 'क्षितिज आणि गार्गी यांच्यामध्ये मृत्युंजय' बंगल्याच्या निमित्ताने पुढे नक्की काय घडणार याची उत्सुकता आता निर्माण होत आहे. क्षितिज आणि गार्गी यांचा मंतरलेल्या घरासोबतचा हा प्रवास सोमवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता, झी युवावर पहा. 

टॅग्स :सुयश टिळकएक घर मंतरलेलं