Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुष्मिता सेनच्या ‘ताली’मध्ये मराठमोळा अभिनेता साकारणार तृतीयपंथीची भूमिका, तुम्ही ओळखलं का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 18:39 IST

'ताली' वेब सीरिजमध्ये प्रसिद्ध मराठी अभिनेता दिसणार किन्नरच्या भूमिकेत

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन तिच्या आगामी ‘ताली’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. तृतीयपंथियांच्या हक्कासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा देणाऱ्या गौरी सावंत यांच्या आयुष्यावर आधारित आहे. नुकताच या वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. सुष्मिता सेनबरोबर या सीरिजमध्ये अनेक मराठी कलाकारांनी काम केलं आहे. याची झलक सीरिजच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली. अभिनेता सुव्रत जोशीही या वेब सीरिजमध्ये झळकला आहे.

‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेतून घराघरात पोहोचलेला सुव्रतने ‘ताली’ वेब सीरिजमध्ये सुष्मिता सेनबरोबर स्क्रीन शेअर केली आहे. या सीरिजमध्ये त्याने तृतियपंथीयाची भूमिका साकारली आहे. सुव्रतने नुकतंच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ताली वेब सीरिजमधील एका सीनचा फोटो शेअर करत ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. या पोस्टला त्याने “पाच दिवस बाकी आहेत...या प्रोजेक्टबद्दल आणि सीरिजमध्ये साकारलेल्या भूमिकेबद्दल खूप काही सांगायचं आहे. लवकरच याबाबत सांगेन. पण, आता मी आनंदी, उत्साही आहे. आणि फक्त दिवस मोजत आहे. या फोटोमध्ये तुम्ही मला पाहू शकता. मी क्वीनच्या बाजूला बसलो आहे. ये कहाणी है अधिकार और पहचान की, ये कहाणी है गाली से ताली तक के सफर की,” असं कॅप्शन दिलं आहे.

‘बाईपण भारी देवा’ पाहिल्यानंतर राज ठाकरे भारावले, म्हणाले, “मी घरी आल्यावर पत्नीला...”

राहुल गांधी फ्लाइंग किस वाद: प्रकाश राज यांनी स्मृती इराणींनाच सुनावलं, म्हणाले, "मॅडमजी..."

सुव्रतच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत त्याला शुभेच्छा देत त्याचं अभिनंदन केलं आहे. सुव्रतला या नव्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहतेही आतूर आहेत. ‘ताली’ वेब सीरिजचं दिग्दर्शन रवी जाधव यांनी केलं आहे. या सीरिजमध्ये हेमांगी कवी, कृतिका देव, ऐश्वर्या नारकर हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. १५ ऑगस्टपासून ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टॅग्स :सुश्मिता सेनसुव्रत जोशीमराठी अभिनेता