माजी मिस युनिव्हर्स आणि बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन(Sushmita Sen)ने तिच्या रिलेशनशिप स्टेटसचा खुलासा करून मनोरंजन विश्वात एक नवीन खळबळ उडवून दिली आहे. अभिनेत्री बिझनेसमन आणि आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदीं(Lalit Modi)ना डेट करत आहे. काल संध्याकाळी ललित मोदींनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून सुष्मिता सेनसोबतच्या नात्याची घोषणा केली. या दरम्यान आता सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांचे एक जुने ट्विट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
ललित मोदींच्या २०१३ सालच्या ट्विटचा स्क्रीनशॉट ट्विटरवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या ट्विटमध्ये ललित सुष्मिताला टॅग करत माझ्या एसएमएसला उत्तर देण्यास सांगत आहे. या ट्विटनंतर यूजर्स त्यावर जोरदार कमेंट करत आहेत. इथूनच त्यांच्या नात्याची सुरुवात झाली असं कुणी म्हणतंय. तर कोणी ललित मोदींची स्तुती करत आहे. तथापि, हे ट्विट ९ वर्षे जुने आहे आणि ते आता सुष्मिता आणि ललितच्या नात्याला जोडून पाहिले जात आहे.
तर ललित मोदींच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी १९९१ मध्ये मीनल मोदीसोबत लग्न केले. मीनल मोदी यांचे २०१८ मध्ये कर्करोगामुळे निधन झाले.