Join us
Daily Top 2Weekly Top 5

Sushmita Sen Birthday Special : सुश्मिता सेनचा बॉयफ्रेंड रोहमन शॉलने तिला अशा दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2018 15:32 IST

रोहमनने सुश्मिताच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इन्स्टाग्रामवर तिच्यासाठी एक फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टद्वारे तो आपले प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. रोहमनने त्याचा आणि सुश्मिताचा एक खूप छान फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

ठळक मुद्देरोहमनने त्याचा आणि सुश्मिताचा एक खूप छान फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे आणि त्यासोबत लिहिले आहे की, बघा... आज कोणाचा वाढदिवस आहे. जान तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुझ्या आयुष्यातील आज एक महत्त्वाचा दिवस असून तो खूप छान प्रकारे साजरा कर... तुझसुश्मिताचा हा ४३ वा वाढदिवस असून तिच्या मुलींसोबत ती दुबईत वाढदिवस साजरा करत असून तिने तिथला एक व्हिडिओ देखील इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. 

गेल्या काही दिवसांपासून सुश्मिताच्या आयुष्यात एका हॅण्डसम तरूणाने एन्ट्री घेतलीय. हा तरूण कुणी दुसरा नाही तर मॉडेल रोहमन शॉल आहे. सुश्मिता आणि रोहमन यांच्यातील जवळीक चांगलीच वाढली असून सुश्मिताने देखील त्यांच्या प्रेमाची कबुली दिली आहे. आज सुश्मिताचा वाढदिवस असून रोहमनने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

सुश्मिताचा हा ४३ वा वाढदिवस असून तिच्या मुलींसोबत ती दुबईत वाढदिवस साजरा करत असून तिने तिथला एक व्हिडिओ देखील इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. 

रोहमनने देखील तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इन्स्टाग्रामवर तिच्यासाठी एक फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टद्वारे तो आपले प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. रोहमनने त्याचा आणि सुश्मिताचा एक खूप छान फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे आणि त्यासोबत लिहिले आहे की, बघा... आज कोणाचा वाढदिवस आहे. जान तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुझ्या आयुष्यातील आज एक महत्त्वाचा दिवस असून तो खूप छान प्रकारे साजरा कर... तुझे पुढचे वर्षं खूप चांगले जाऊ दे... आय लव्ह यू फॉरेव्हर... 

सुश्मिता आणि रोहमन लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून मीडियात रंगली होती. पण सुश्मिताने काही दिवसांपूर्वी स्वत:चा एक एक्सरसाईज व्हिडिओ शेअर करत, तिच्या आणि रोहमनच्या लग्नाच्या बातम्या निव्वळ अफवा असल्याचे म्हटले होते. ‘मी लग्नासाठी तयार होतेय, असा जगाचा कयास आहे पण या सगळ्या बातम्या व्यर्थ आहेत. तूर्तास लग्नाचा कुठलाही इरादा नाही. सध्या रोहमनसोबत रोमान्स सुरू आहे आणि हे सांगणे पुरेसे आहे. मी सत्य काय ते सांगितलेय. सर्वांना प्रेम...,’ असे सुश्मिताने लिहिले होते. सुश्मिताच्या या पोस्टने एक गोष्ट स्पष्ट झाले होते की, तूर्तास रोहमनसोबत तिने लग्नाचा विचार केलेला नाहीये. कदाचित ती या नात्याला पुरेसा वेळ देऊ इच्छिते.

सुश्मिता सध्या मोठ्या पडद्यापासून दूर आहे. पण रोमान्स आणि लूक्सच्या बातम्यांमुळे ती कायम चर्चेत असते. 

टॅग्स :सुश्मिता सेन