Join us
Daily Top 2Weekly Top 5

टचस्क्रीन फोनमुळे सुरू झाली होती सुष्मिता सेनची लव्ह स्टोरी, रोहमनने आधी लपवलं होतं वय....

By अमित इंगोले | Updated: November 19, 2020 11:44 IST

रोहमन सुष्मितापेक्षा १५ वर्षांनी लहान आहे. पण दोघांच्या केमिस्ट्रीकडे बघता हे अंतर अजिबात जाणवत नाही. आज सुष्मिता सेनचा वाढदिवस त्यानिमित्ताने जाणून घेऊ त्यांची लव्हस्टोरी.

सुष्मिता सेन आणि रोहमन शॉलची जोडी चांगलीच फेमस आहे. लोक त्यांच्या प्रेमाची उदाहरणे देतात. जेव्हा त्यांची लव्हस्टोरी लोकांसमोर आली तेव्हा दोघेही चर्चेत आले होते. त्याच एक कारण म्हणजे दोघांच्या वयातील अंतर. रोहमन सुष्मितापेक्षा १५ वर्षांनी लहान आहे. पण दोघांच्या केमिस्ट्रीकडे बघता हे अंतर अजिबात जाणवत नाही. आज सुष्मिता सेनचा वाढदिवस त्यानिमित्ताने जाणून घेऊ त्यांची लव्हस्टोरी.

इन्स्टाग्रामवर सुरू झाली लव्हस्टोरी

अनेकांना असं वाटतं की, रोहमन आणि सुष्मिता सेनची लव्हस्टोरी फॅशन शो दरम्यान सुरू झाली होती. पण सुष्मिताने एका मुलाखती दरम्यान सांगितले की, त्यांची लव्हस्टोरी एका टच स्क्रीन फोनमुळे सुरू झाली होती. सुष्मिताने सांगितले होते की, रोहमनने तिला इन्स्टाग्रामवर डीएम केलं होतं. सुष्मिता तेव्हा मेसेज चेक करत नव्हती. कारण तिला असं वाटत होतं की, असं केल्याने लोकांना तिच्यासोबत इंटरॅक्टची परमिशन मिळेल. सुष्मिताकडे अनेक डीएम आले होते, पण ती चेक करत नव्हती.

टच स्क्रीन फोनमुळे ओपन झाला मेसेज

तिने सांगितले होते की, टच स्क्रीन फोनमुळे ती डीएममध्ये चुकून गेली आणि चेक करू लागली. स्क्रोल करता करता तिला रोहमनचा मेसेज दिसला आणि नंतर ती त्याच्यासोबत चॅट करू लागली. त्यानंतर तिला जाणीव झाली की, तिने काय केलं, तिने असं करायला नको होतं. 

सुष्मिताने सांगितले की, तिला रोहमन फारच स्फूर्ती असलेला तरूण वाटला. त्यानंतर तिने त्याला मेसेज केला की, धन्यवाद तुमच्या मेसेजने माझा दिवस चांगला झाला. तुमच्यासाठी जगभरातील आनंदाची प्रार्थना करतो. रोहमन हा सुष्मिताचं उत्तर पाहून फार आनंदी झाला होता. त्याने रिप्लाय करत मेसेज पाठवला की, मी एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये उड्या मारत फिरत आहे. विश्वास बसत नाहीये की, तुम्ही मला उत्तर दिलं.

रोहमनने लपवलं होतं वय

त्यावेळी सुष्मिता यूएसला जात होती. हळूहळू दोघांमध्ये मैत्री वाढली. त्यानंतर सुष्मिता भारतात परत आली तेव्हा त्याने तिला फुटबॉल खेळण्याची ऑफर दिली. सुष्मिताने सांगितले की, जेव्हा ती रोहमनला पहिल्यांदा भेटली तेव्हा वाटलं की, त्याला मी खूप आधीपासून ओळखते. मजेदार बाब ही आहे की, रोहमनने सुरूवातीला त्याचं खरं वय तिला सांगितलं नव्हतं. सुष्मिताचं मत आहे की, रोहमन फार समजदार आहे आणि ती कोणतीही गोष्ट कंडीशनमध्ये बांधत नाही. 

टॅग्स :सुश्मिता सेनबॉलिवूडदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट