Join us
Daily Top 2Weekly Top 5

टीव्ही इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवण्यापूर्वी अंकिता लोखंडेने बदलले होते तिचे नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2020 19:12 IST

तुम्हाला माहित आहे का की, इंडस्ट्रीत येण्या आधी काय होते अंकिता लोखंडेचे खरे नाव ?

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर त्याची एक्सगर्लफ्रेंड अंकिता लोखंडे चर्चेत आली आहे. सुशांत आणि अंकिता जवळपास 6 वर्षे रिलेशनशीपमध्ये होते. त्यानंतर अचानक त्यांचे ब्रेकअप झाले. सुशांतने टीव्हीवरून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तर अंकिता टीव्हीमध्ये काम करत राहिली.  कंगना राणौतच्या मणिकर्णिका सिनेमातून अंकिताने बॉलिवूडमध्ये डेब्यू केले. पण तुम्हाला माहित आहे का की, इंडस्ट्रीत येण्या आधी काय होते अंकिता लोखंडेचे खरे नाव ?

हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, पवित्र रिश्ता फेम अंकिता लोखंडेचे खरे नाव तनूजा होते. टीव्ही जगतात पदार्पण करण्यापूर्वी तिने आपले नाव बदलले होते. अंकिता हे तिचे टोपण नाव होते. अंकिताने ठरवलं की तिला तिच्या टोपण नावाने इंडस्ट्रीमध्ये ओळखले जाईल. जवळचे मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक तिला अंकिता नावाने हक्क मारायचे. त्यानंतर तिने तनूजाचे अंकिता केले.  

या व्हिडीओमध्ये सुशांत अंकिता लोखंडेवर किती प्रेम करायचा याचा पुरावा आहे. अंकितासोबतच्या नात्याबाबत बोलताना सुशांतने शेअरीने सुरुवात केली, सुशांत म्हणतो, ''मोहब्बत में नहीं है फर्क जीने और मरने का, उसी को देखकर जीते हैं जिस काफिर पर दम निकले.'' पुढे सुशांत म्हणतो, गेल्या सहा वर्षांत अंकिताने खूप धीर दिला आहे. खूप प्रेम करते आणि ती माझ्याबरोबर राहण्यासाठी एक्सायडेट असते. ती खूप सुंदर आहे आणि माझं तिच्यावर खूप प्रेम आहे, मला तिच्यासोबत राहायचं आहे.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतअंकिता लोखंडे