Join us
Daily Top 2Weekly Top 5

जेवणाच्या ताटावर सुशांतच्या वडिलांना मिळाली मुलाच्या मृत्यूची बातमी, रडून रडून झाली अशी अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2020 16:38 IST

टीव्ही लावला आणि... ! सुशांतच्या मानसिक आजाराबाबत त्यांना माहिती नव्हती. त्यामुळे सुशांतच्या जाण्याने त्याच्या वडिलांना धक्का बसला आहे.

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला आणि पुढे बॉलिवूडप्रेमींच्या मनांत खास जागा निर्माण करणारा अभिनेता सुशांत सिंग राजपूत आता आपल्यात नाही. सुशांतने गळफास घेत आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. 34 वर्षांचा सुशांत गेल्या अनेक महिन्यांपासून डिप्रेशनमध्ये होता, असे कळतेय. सुशांतच्या आत्महत्येने त्याच्या अख्ख्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. त्याच्या वडिलांची स्थिती तर प्रचंड वाईट आहे. मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकताच ते सून्न झालेत. तेव्हापासून ते एक शब्दही बोललेले नाहीत. डोळ्यांना अश्रूंच्या धारा आहेत आणि मनात अनेक प्रश्न. सुशांतने इतके टोकाचे पाऊल का उचलावे, हा प्रश्न त्यांना सतावतो आहे.

सुशांत मूळचा पाटण्याचा. मुंबईत वांद्रे भागात तो एकटा राहायचा. सुशांतचे वडील सरकारी नोकरीत होते. सुशांत 16 वर्षांचा असतानाच त्याच्या आईचे निधन झाले होते.  सुशांत सिंह हा मूळचा बिहारचा असून काही दिवसांपूर्वी तो आपल्या वडिलोपार्जित घरीही आला होता. तो मूळचा पूर्णियामधील बधारा कोठी येथील मालडीहाचा रहिवासी होता. 2002 साली सुशांतच्या आईचे निधन झाल्यानंतर सुशांतचे बाबा तेथेच राहत होते. सुशांतच्या मानसिक आजाराबाबत त्यांना माहिती नव्हती. त्यामुळे सुशांतच्या जाण्याने त्याच्या वडिलांना धक्का बसला आहे.

जेवण करत असताना मिळाली बातमी सुशांतच्या आत्महत्येबाबत त्याच्या वडिलांना काहीही माहिती नव्हती. ते पाटण्यातील आपल्या घरी जेवत होते. जेवताना त्यांना सुशांतच्या निधनाची बातमी कळली. फोन आला आणि तसे ते ताटावरून उठले.   त्यानंतर त्यांच्याकडे घरकाम करणाऱ्या लक्ष्मी यांनी टीव्ही लावला.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत