Join us
Daily Top 2Weekly Top 5

यापुढे पैसे देऊ शकणार नाही...! आत्महत्येच्या तीन दिवसांपूर्वी कर्मचा-यांना पगार देताना असे का म्हणाला होता सुशांत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 13:33 IST

चौकशीतून सुशांतची एक्स मॅनेजर दिशा सालियन हिच्याबद्दलचीही नवी माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देगेल्या काही महिन्यांपासून सुशांतला आर्थिक अडचणींचाही सामना करावा लागत होता. 

सुशांत सिंग राजपूत सारखा अभिनेता आत्महत्या का करेन, हा प्रश्न अद्यापही चाहत्यांना छळतो आहे. तूर्तास सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरु आहे. असे म्हणतात की, गेल्या काही महिन्यांपासून सुशांत डिप्रेशनमध्ये होता. काहींच्या मते, प्रोफेशनल आयुष्यातील अडचणी आणि चित्रपटांतून काढून टाकल्यामुळे तो दु:खी होता. आता सुशांतच्या आत्महत्येसंदर्भात आणखी नवी माहिती पुढे आली आहे.

मिड डेने दिलेल्या वृत्तानुसार, आत्महत्येच्या तीन दिवसपूर्वी सुशांतने त्याच्यावर असलेल्या सर्व कर्जांची परतफेड केली होती. घरी काम करणारे नोकर व सर्व कर्मचा-यांचे पगार दिले होते. मात्र पगार देताना, यापुढे पैसे देऊ शकणार नाही, असे तो म्हणाला होता. यावर ‘तुम्ही आम्हा सर्वांची आत्तापर्यंत काळजी घेतलीये. आपण काही तरी करू, तुम्ही असे काही बोलू नका, ’असे नोकराने सुशांतला म्हटले होते.

सूत्रांने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून सुशांतला आर्थिक अडचणींचाही सामना करावा लागत होता. कारण त्याला अनेक प्रोजेक्टमधून बाहेर काढण्यात आले होते. एका पाठोपाठ एक अनेक प्रोजेक्ट हातचे गेल्याने सुशांत निराश होता.चौकशीतून सुशांतची एक्स मॅनेजर दिशा सालियन हिच्याबद्दलचीही नवी माहिती समोर आली आहे. दिशा आधी सुशांतसाठी काम करायची. प्राप्त माहितीनुसार, दिशाच्या माध्यमातून सुशांतला एका वेबसीरिजचा सुमारे 4 कोटी रूपयांचा प्रोजेक्ट मिळणार होता. मात्र 8 जूनला दिशानेच आत्महत्या केली. यामुळे सुशांतला मोठा धक्का बसला होता. तिच्या आत्महत्येची बातमी ऐकून सुशांत डिप्रेशनमध्ये गेला होता. मात्र सुशांत व दिशाच्या मृत्यूचा काही संबध आहे का, याबाबत पोलिस कुठल्याही ठोस निष्कर्षावर पोहोचलेले नाहीत.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत