Join us
Daily Top 2Weekly Top 5

शेवटचा सिनेमा शूट करताना कशी होती सुशांतची अवस्था? जाणण्यासाठी आता या अभिनेत्रीची होणार चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2020 11:31 IST

 ‘दिल बेचारा’ हा सुशांतचा शेवटचा सिनेमा. या शेवटच्या सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी सुशांतची अवस्था काय होती. त्यासाठी पोलीस आता या सिनेमाच्या अभिनेत्रीची चौकशी करणार आहेत.

ठळक मुद्देपोलिसांनी सुशांतच्या काही जवळच्या व्यक्तींची चौकशी केली होती. 

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी अनेकांची कसून चौकशी केली. वांद्रे पोलिसांकडून आत्तापर्यंत 25 लोकांची चौकशी करण्यात आली आहे. सुशांतने यशराज फिल्म्ससोबत साइन केलेला करार मोडला होता यामुळे यशराजच्या दोन कर्मचा-यांचीही चौकशी झाली. जेणेकरून त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण शोधता येईल.  अशात आता पोलिस अभिनेत्री संजना सांघीचीही चौकशी करणार आहेत. ‘दिल बेचारा’ हा सुशांतचा शेवटचा सिनेमा. या शेवटच्या सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी सुशांतची अवस्था काय होती. त्यासाठी पोलीस आता  या सिनेमाची अभिनेत्री संजना सांघी हिची चौकशी करणार आहेत.

उद्या सोमवारी  सोमवारी वांद्रे पोलीस स्टेशनला चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. मुंबई पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  ‘दिल बेचारा’च्या शूटिंग दरम्यान संजना व सुशांत या दोघांमध्ये काही वाद झाले होते. मात्र नंतर दोघांनीही भांडण विसरुन सिनेमाचे शूट पूर्ण केले होते. त्यामुळे आता पोलिसांना तो वाद नेमका काय होता आणि त्याचे काही कनेक्शन सुशांतच्या आत्महत्येशी आहे का हे जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहेत. 

‘दिल बेचारा’च्या सेटवर सुशांत संजनासोबत 'ओव्हर फ्रेन्डली' झाला आणि त्याच्या त्या वागण्याला कंटाळून संजना सेटवरून निघून गेली, अशी बातमी मध्यंतरी आली होती. या प्रकारानंतर सुशांतने संजनासोबतचे खासगी चॅट सोशल मीडियावर शेअर करून हे आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले होते.

सुशांत मागच्या काही दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होता. कोणीतरी आपले करिअर संपवण्याच्या मागे आहे, असे त्याला वाटत होते. काही लोक आपली जाणीवपूर्वक  बदनामी करत आहेत, असेही त्याला वाटत होते. त्यामुळे आता संजनाच्या जबाबातून काही महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता पोलिसांना वाटत आहे.

नकारात्मक गोष्टींमुळे होता अस्वस्थपोलिसांनी सुशांतच्या काही जवळच्या व्यक्तींची चौकशी केली होती. या चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार,  सुशांत मागच्या काही काळापासून वृत्तपत्र, वेबसाइट आणि सोशल मीडियावर त्याच्याबाबत लिहिल्या जाणा-या नकारात्मक गोष्टींमुळे अस्वस्थ होता.  त्याला सतत कोणीतरी आपले करिअर संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचे भास होत असत.    

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत