Join us
Daily Top 2Weekly Top 5

सूर्यकुमार यादव आणि गायिका श्रेया घोषालमध्ये आहे 'हे' खास कनेक्शन, वाचून तुम्हीही थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 13:28 IST

'सुरांची राणी' म्हणून ओळखली जाणारी श्रेया घोषाल हिच्यासोबतचं सूर्यकुमार यादवचं खास कनेक्शन समोर आलं आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव आज जगातील अव्वल खेळाडूंपैकी एक आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने विक्रमी तिसऱ्यांदा टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली. खूप उशीरानं टीम इंडियात संधी मिळालेल्या सूर्यानं फलंदाजीसह नेतृत्वाची खास छाप सोडली आहे. तर दुसरीकडे, आपल्या मधुर आवाजाने कोट्यवधींच्या हृदयावर राज्य करणारी श्रेया घोषाल  संगीताच्या दुनियेतील सर्वोच्च शिखरावर आहे. ही दोन्ही व्यक्तिमत्त्वे आपापल्या क्षेत्रात दिग्गज आहेत, पण या दोघांमध्ये एक असं खास कनेक्शन आहे जे फार कमी लोकांना ठाऊक आहे.

सूर्यकुमार यादव आणि श्रेया घोषाल यांचा थेट संबंध नसला तरी, त्यांच्यातील कनेक्शन हे श्रेयाचा भाऊ सोम्यदीप घोषाल हा आहे. सूर्यकुमार आणि सोम्यदीप हे बालपणीचे मित्र आहेत. मुंबईतील अनुशक्ती नगर कॉलनीच्या मैदानावर हे दोघेही एकत्र क्रिकेट खेळायचे. श्रेया आणि सूर्या एकाच कॉलनीमध्ये लहानाचे मोठे झाले असल्याने त्यांचे कौटुंबिक ऋणानुबंध जुने आहेत.

जेव्हा सूर्यकुमार यादवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजीने जग जिंकले, तेव्हा श्रेया घोषालने सोशल मीडियावर त्याचे खास अभिनंदन केले होते. तिने जुन्या आठवणींना उजाळा देत म्हटले होते की, "सूर्यकुमार आणि माझा भाऊ बालपणी एकत्र क्रिकेट खेळायचे. ते दिवस अजूनही संस्मरणीय आहेत". 

दोन वेगवेगळ्या जगातील दोन 'किंग'श्रेया घोषालने भारतीय चित्रपटसृष्टीत हजारो गाणी गाऊन अनेक राष्ट्रीय आणि फिल्मफेअर पुरस्कार पटकावले आहेत. तर सूर्यकुमार यादवने आपल्या 'मिस्टर ३६०' शैलीने टी-२० क्रिकेटमध्ये भारताला विश्वविजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Surya Kumar Yadav and Shreya Ghoshal share a surprising connection!

Web Summary : Surya Kumar Yadav and Shreya Ghoshal share a connection through Shreya's brother, Soumyadeep, Surya's childhood friend. They grew up in the same Mumbai colony and played cricket together. Shreya congratulated Surya on his cricketing success, reminiscing about their childhood days.
टॅग्स :श्रेया घोषालसूर्यकुमार यादव