Join us
Daily Top 2Weekly Top 5

"दिग्दर्शकाने माझ्या शरीराचा एक एक अंग पाहण्याची मागणी केली होती", या अभिनेत्रीने केला होता गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2020 10:15 IST

गेल्या काही वर्षापासून सुरवीन सिनेसृष्टीपासून लांबच आहे. सुरवीन चावलाने २०१५ साली व्यावसायिक अक्षय ठक्करसोबत इटलीत लग्न केले होते.  २०१७ साली तिने सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून लग्नाचा खुलासा केला होता.

हिंदी चित्रपटसृष्टीत कास्टिंग काऊच आणि लैंगिक शोषणाचे आरोप कायम होत असतात. संधी मिळावी यासाठी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांकडून कास्टिंग काऊच किंवा लैंगिक शोषण झाल्याचा आरोप अनेक अभिनेत्रींनी केला आहे. सोशल मीडियावर #metoo च्या माध्यमातून अनेक अभिनेत्रींनी आपल्यासोबत झालेल्या अत्याचारांना वाचा फोडली होती. यांत अभिनेत्री राधिका शर्मा, स्वरा भास्कर, रिचा चढ्ढा, कोंकणासेन शर्मा यांचा समावेश आहे. याच यादीत आता आणखी एका अभिनेत्रीची भर पडली आहे. 

या अभिनेत्रीचं नाव  सुरवीन चावला असून तिने घेतलेले नाव अनेकांसाठी धक्कादायक आहे.  सुरवीनने एक-दोन वेळा नाही तर पाच वेळा कास्टिंग काऊचची शिकार झाल्याचं एका मुलाखतीत म्हटलं होतं. एका दाक्षिणात्य दिग्दर्शकाने माझ्या शरीराचा एक एक अंग पाहण्याची मागणी केली होती. इतकंच नाही तर अनेकांनी माझ्या वजनामुळे सुद्धा मला विचित्र प्रश्न विचारत हैराण करून सोडले होते. एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने ही आपबीती सांगितली आहे.

हा प्रकार आठवला की आजही दचकते असंही तिने म्हटले आहे. या सगळ्या प्रकारानंतर चित्रपटसृष्टीच्या दुतोंडी वृत्तीवरही तिने तोंडसुख घेतले आहे. माझ्यासोबतच नाही तर अन्य काही अभिनेत्रींसोबत गैरवर्तन करुनही अनेकजण चित्रपटसृष्टीत काम करत असल्याबद्दल तिने संताप व्यक्त केला आहे. कुणीही घाबरुन  बोलत नसल्याचंही तिने म्हटले आहे. 

गेल्या काही वर्षापासून सुरवीन सिनेसृष्टीपासून लांबच आहे. सुरवीन चावलाने २०१५ साली व्यावसायिक अक्षय ठक्करसोबत इटलीत लग्न केले होते.  २०१७ साली तिने सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून लग्नाचा खुलासा केला होता. या जोडप्याने आपल्या मुलीचे नाव ईवा ठेवले आहे. ईवा हा इंग्रजी शब्द असून याचा अर्थ जीवनातील आई असा आहे असे सांगत आनंद व्यक्त केला होता. 

टॅग्स :सुरवीन चावला