Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठी अभिनेत्रीने शेअर केलेला तिचा हॉट अँड बोल्ड फोटो पाहुन व्हाल खल्लास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 12:02 IST

फोटोंमधील अदा कुणालाही घायाळ करतील अशाच आहेत

सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरुची अडारकर नेहमीच फॅन्सच्या संपर्कात असते. तिच्या फोटो आणि व्हिडीओना फॅन्स भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स देत असतात. छोटा पडदावर सुरुचीच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे सुरुचीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली.

सुरुची सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. कधी व्हिडीओ तर कधी फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. सुरुचीने तिचे बोल्ड आणि हॉट फोटोशूट इन्स्टाग्रामवर  शेअर केला आहे. या फोटोंमधील सुरुचीच्या अदा कुणालाही घायाळ करतील अशाच आहेत. सुरुचीने ग्लॅमरस फोटोशूट केलं असून यामध्ये तिचा नवा अंदाज पाहायला मिळत आहे. तिच्या  या फोटोशूटवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

२००७ मध्ये सुरुचीने सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केलं. ‘का रे दुरावा’, ‘अंजली’ या मालिकेतून घराघरात पोहोचली आहे. 'का रे दुरावा'मधील सुयश टिळक आणि सुरुची यांच्यातील केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मनं जिंकली होती.

सुरुचीने प्रेक्षकांना विविध भूमिकेतून चांगलीच भुरळ पाडली आहे. सुरुचीने 'एक घर मंतरलेलं' या मालिकेत पत्रकाराची भूमिका साकारली होती. आपलं बुआ असं आहे', 'ओळख', 'एक तास भुताचा' आणि 'पहचान' या मालिकांमध्ये सुरूची विविध भूमिकांमध्ये दिसली.

टॅग्स :सुरुची आडारकर