Join us  

तोल गेला अन् टीव्हीची ‘नागिन’ सुरभी ज्योती धपकन् पडली! पाहा व्हायरल Video

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 6:00 PM

टीव्हीची ‘नागिन’ सुरभी ज्योती सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव्ह असते. सध्या तिने शेअर केलेला एक व्हिडीओ वा-याच्या वेगाने व्हायरल होतोय.

ठळक मुद्देसुरभी ज्योती ही पंजाबी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री असून तिनं अनेक पुरस्कारही पटकावले आहेत.

टीव्हीची ‘नागिन’ सुरभी ज्योती सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव्ह असते. इन्स्टावर स्वत:चे रोज नवे व्हिडीओ, फोटो ती शेअर करते. सध्या तिने शेअर केलेला एक व्हिडीओ वा-याच्या वेगाने व्हायरल होतोय. होय,  शूटींगच्या सेटवर सुरभीचा अचानक तोल जातो आणि ती पडते.सध्या सुरभी ‘कुबुल है 2’ या शोचे शूटींग करतेय. याच शूटींगदरम्यानचा हा व्हिडीओ आहे. पांढ-या रंगाचा लेहंगा घालून सुरभी पाठमोरी येते आणि धपकन् पडते. भररस्त्यावर शूटींग सुरु असल्याने सगळ्यांसमोर तिची फजिती होते. ‘थोडे झोया क्षण...’ असे कॅप्शन हा व्हिडीओ शेअर करताना सुरभीने दिले आहे.  झोया फारुकी ही ‘कुबूल है’ मध्ये तिने साकारलेली भूमिका प्रचंड गाजली होती. त्यामुळेच या व्हिडीओला तिने झोया क्षण... असे कॅप्शन दिले आहे.

 ‘कुबूल है 2’मालिकेत तिच्याबरोबर करणसिंग ग्रोव्हर  असद  ही मुख्य भूमिका साकारणार आहे.

 सुरभी ज्योती पंजाबी चित्रपट आणि मालिकांमधील लोकप्रिय चेहरा आहे.सुरभी ज्योतीने कलर्स वाहिनीवरील मालिका ‘नागिन’च्या तिसºया सीझनमध्ये मुख्य भूमिका केली होती. सुरभी ज्योती सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. सुरभी ज्योतीचे इंस्टाग्रामवर ६ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.

सुरभी ज्योती ही पंजाबी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री असून तिनं अनेक पुरस्कारही पटकावले आहेत. 2012 मध्ये तिने ‘कुबूल है’ मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर पदार्पण केले. 2015 मध्ये तिने ‘प्यार तुने क्या किया’ या कार्यक्रमाच्या तिन्ही सीझनचे सूत्रसंचालन केले. 

टॅग्स :नागिन 3