Join us

'सूर नवा, ध्यास नवा' शो घेणार निरोप, 'या' दिवशी रंगणार ग्रँड फिनाले!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2023 16:00 IST

Sur Nava Dhyas Nava Show Grand Finale : सूर नवा ध्यास नवा - आवाज तरुणाईचा अंतिम सोहळा सर्वोत्तम ६ स्पर्धकांचा कमाल परफॉर्मन्स आणि मराठी सिनेसृष्टीतील लाडक्या कलाकारांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

कलर्स मराठीवरील 'सूर नवा ध्यास नवा-आवाज तरुणाई' (Sur Nava Dhyas Nava Show)चा या पर्वाला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले. ‘जुनं ते सोनं, पण नवंही हवं’ हा प्रयोग प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला. या पर्वातील सगळेच स्पर्धक उत्तम असून यांपैकी सर्वोत्तम ६ पर्वाच्या शेवटी येऊन पोहोचले आहेत. आवाज तरुणाईचा या पर्वाचा ग्रॅण्ड फिनाले जवळ आला आहे. 

सूर नवा ध्यास नवा - आवाज तरुणाईचा अंतिम सोहळा सर्वोत्तम ६ स्पर्धकांचा कमाल परफॉर्मन्स आणि मराठी सिनेसृष्टीतील लाडक्या कलाकारांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. हा सोहळा दिमाखदार अंदाजात साजरा होणार आहे. हा अद्वितीय उत्सव, या पर्वाच्या सर्वोत्तम ६ स्पर्धकांचा कमाल परफॉर्मन्स, भव्य नृत्य प्रदर्शन आणि मराठी सिनेसृष्टीतील प्रतिष्ठित कलाकारांसोबत साजरा होणार आहे. 

हा अतुलनीय उत्सव केवळ मंत्रमुग्ध करणाऱ्या गाण्यांचा नसून बॉलिवूड धक धक गर्ल माधुरी दीक्षित, दिग्गज कलाकार नाना पाटेकर, विनोदाचे बादशाह मकरंद अनासपुरे आणि आपल्या मधुर आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करणाऱ्या गायिका साधना सरगम यांसारख्या प्रतिष्ठित कलाकारांच्या हजेरीने हा सोहळा आणखीनच ग्रॅण्ड होणार आहे. थर्टी फर्स्टचा प्लॅन दिमाखात साजरा करण्यासाठी ‘सूर नवा ध्यास नवा - आवाज तरुणाईचा’ ग्रॅण्ड फिनाले रविवार, ३१ डिसेंबर, संध्याकाळी ७ वाजता लाडक्या कलर्स मराठीवर पाहा. 

टॅग्स :कलर्स मराठीसूर नवा ध्यास नवा