Join us
Daily Top 2Weekly Top 5

गोपाळ गावंडे ठरला ‘सूर नवा ध्यास नवा’चा महागायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 11:59 IST

Sur nava dhyas nava: नुकताच यंदाच्या पर्वाचा ग्रँड फिनाले पार पडला.

छोट्या पडद्यावर विशेष लोकप्रिय ठरलेला कार्यक्रम म्हणजे 'सूर नवा ध्यास नवा' (Sur Nava Dhyas Nava Show). आतापर्यंत या कार्यक्रमाचे अनेक पर्व गाजले आहेत. यामध्येच नुकताच यंदाच्या पर्वाचा ग्रँड फिनाले पार पडला आणि सूर नवाला त्यांचा महागायक मिळाला.  गोपाळ गावंडे हा यंद्याच्या पर्वाचा विजेता ठरला आहे.

अकोल्याचा गोपाळ गावंडे याने त्याच्या आवाजाच्या जोरावर ‘सूर नवा ध्यास नवा - आवाज तरुणाईचा’ या ६व्या पर्वाचं जेतेपद पटकावलं आहे. कार्यक्रमाच्या उल्लेखनीय प्रवासात, गोपाळचं उत्कृष्ट सादरीकरण व अपवादात्मक कामगिरी पाहायला मिळाली. स्पर्धेतील त्याच्या उल्लेखनीय प्रवासामुळे तो या पर्वाचा ‘महागायक’ ठरला.

दरम्यान, या पर्वात जुनी गाणी नव्या अंदाजात ऐकायला मिळाली. या नव्या प्रयोगाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. 

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकार