Join us
Daily Top 2Weekly Top 5

सावत्र आई सुप्रिया पाठकसोबत असं आहे शाहिद कपूरच नातं, अशी झाली होती पहिली भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 13:10 IST

शाहिद कपूरचे वडील आणि अभिनेता-चित्रपट निर्माता पाकंज कपूर यांनी सुप्रिया पाठकसोबत दुसरे लग्न केले.

बॉलिवूडमध्ये अशी अनेक कुटुंबे आहेत जिथे कलाकार आपल्या आईबरोबरच सावत्र आईवरही प्रेम करतात. यात शाहिद कपूरच्या कुटूंबाचाही समावेश आहे, शाहिद कपूरचे वडील आणि अभिनेता-चित्रपट निर्माता पाकंज कपूर यांनी सुप्रिया पाठकसोबत दुसरे लग्न केले. आता अलीकडेच सुप्रिया पाठकने शाहिद कपूर आणि त्याची पत्नी आणि मुलांसह त्याच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे.

शाहिद कपूरविषयी बोलताना सुप्रिया पाठक म्हणाल्या, शाहिदला पहिल्यांदा भेटले तेव्हा तो सहा वर्षांचा होता. त्यांचे एकमेकांशी असलेले नातं हे आई-मुलाच्या नात्यापेक्षा अधिक आहे. एका मुलाखतीत त्यांनी आपल्या पहिल्या भेटीची आठवण सांगितली.

सुप्रिया पाठक म्हणाल्या, ' आम्ही एकमेकांना मित्र-मैत्रिणीप्रमाणे भेटतो. मी त्याच्या वडिलांची मैत्रिण होते आणि नंतर हे नातं नेहमी असेच राहिले… कारण आम्ही एकत्र  कधीच राहिलो नाही. ती एक अशी व्यक्ती आहे जिच्यावर मी नेहमी अवलंबून असते. मी तिच्यावर खरंच प्रेम करते. '

सुप्रिया पाठक पुढे म्हणाल्या, 'मी नातं शब्दात मांडू शकतं नाही. आपला  नातू जैन आणि नातू मिशा यांच्याविषयी बोलताना सुप्रिया म्हणाल्या की ती त्यांना ते खूप आवडतात आणि ती खूप गोंडस मुले आहेत. 

टॅग्स :शाहिद कपूर