Join us
Daily Top 2Weekly Top 5

सनी लियोनीचा मुलगा दिसतो या स्टार किडसारखा, ओळखा कोण आहे हा स्टार किड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 06:00 IST

नुकतीच सनी लियोनी मुलांसोबत प्ले स्कूलच्या बाहेर स्पॉट झाली.

करीना कपूर खान व सैफ अली खान यांचा छोटा नवाब तैमूर अली खानची लोकप्रियता खूप आहे. स्टार किड्समध्ये तैमूर खूप प्रसिद्ध आहे. तैमूरचे अपडेट व फोटो पाहण्यासाठी त्याचे चाहते आतुर असतात. त्यात आता तर तैमूर सारखा हुबेहूब दिसणारा स्टार किड आहे. सनी लियोनीचा मुलगा तैमूरचा कार्बन कॉपी वाटतो. नुकतीच सनी लियोनी मुलांसोबत प्ले स्कूलच्या बाहेर स्पॉट झाली. या फोटोंमध्ये सनीच्या मुलामध्ये तैमूरची झलक पहायला मिळते. 

जेव्हा तैमूर थोडा लहान होता. त्यावेळी सनी लियोनीच्या मुलासारखा दिसत होता. चबी चबी गाल, स्ट्रेट आयब्रो, स्कीन टोन व मोठे डोळे. या फोटोत सनी लियोनीचा मुलगा तैमूरसारखा दिसतो आहे. सोशल मीडियावर सनी तिच्या मुलासोबतचा फोटो व्हायरल होत आहे.  

सनी लियोनीला तीन मुलं आहेत. २०१७ साली सनीने मुलीला दत्तक घेतलं होतं. तिचं नाव निशा आहे. २०१८ साली सरोगसीच्या माध्यमातून सनीनं दोन मुलांची आई बनली. या मुलांची नाव अशर व नोआ सिंग वेबर अशी आहेत.

सनी लियोनी आपल्या मुलांसोबत वेळ व्यतित करत असते. त्यांना ती बिझी शेड्युलमधून वेळ देते. सनीचे तिच्या मुलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर बऱ्याचदा पहायला मिळतात. सनीचे दोन्ही मुलं खूप क्युट आहेत. 

तर तैमूर अली खान सध्या लंडनमध्ये आहे. करीना कपूर सध्या लंडनमध्ये अंग्रेजी मीडियमचं चित्रीकरण करते आहे आणि सैफही तिथेच आहे.

त्यामुळे तैमूरचे लंडनमध्ये आई-पप्पांसोबत मस्ती करतानाचे फोटो सोशल मीडियावर पहायला मिळत आहेत.

टॅग्स :सनी लियोनीसनी लिओनीतैमुर