Join us

Video: 'भारतीय कपड्यांमध्ये असंच होतं'; कार्यक्रम सुरु होण्यापूर्वीच उसवला सनी लिओनीचा ड्रेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 18:24 IST

Sunny leone :एका कार्यक्रमात इंडियन स्टाइलचा ड्रेस परिधान केल्यानंतर तिला काही अडचणींचा सामना करावा लागला. याचा एक व्हिडीओ तिने पोस्ट करत नाराजी व्यक्त केली आहे.

पॉर्न इंडस्ट्रीला कायमचा रामराम करत बॉलिवूडची वाट धरलेली अभिनेत्री म्हणजे सनी लिओनी.बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये झळकलेली सनी अनेकदा तिच्या प्रोफेशनल लाइफपेक्षा पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत असते. यात गेल्या काही दिवसांपासून सनी तिच्या चाहत्यांसाठी अनेक फोटो, व्हिडीओज शेअर करत आहे. यामध्येच तिचा एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. एका कार्यक्रमात इंडियन स्टाइलचा ड्रेस परिधान केल्यानंतर तिला काही अडचणींचा सामना करावा लागला. याचा एक व्हिडीओ तिने पोस्ट करत नाराजी व्यक्त केली आहे.

अलिकडेच सनीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती एका कार्यक्रमाच्या सेटवर असल्याचं दिसून येत आहे. सोबतच तिचा ड्रेस उसवल्यामुळे काही जण तिच्या ड्रेस शिवून देत आहेत. मात्र, हा ड्रेस ऐन कार्यक्रमाच्या वेळी फाटल्यामुळे सनी चांगलीच वैतागली आहे.

या ड्रेसमध्ये एक प्रॉब्लेम आहे तो म्हणजे एका ठिकाणी मोठा आहे. तर, दुसरीकडे छोटा. त्यामुळे आधी या ड्रेसवर टाके घाला. मग पिन लावा. परत टाका घाला..सतत टाके,टाके,टाके. असंच होतं इंडियन ड्रेसमध्ये  टाके आणि पिन. पाहा चार लोकं आहेत, असं सनी या व्हिडीओमध्ये म्हणत असल्याचं दिसून येत आहे. सनीचा हा व्हिडीओ पाहिल्यावर त्यावर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

दरम्यान, आतापर्यंत या व्हिडीओला ६ लाखांपेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत. सनीने कलाविश्वात पदार्पण केल्यापासून ती अनेक चित्रपटांमध्ये झळकली आहे. 'जिस्म 2' ,जॅकपॉट, 'रागिनी एमएमएस 2' , 'एक पहेली लीला', 'कुछ-कुछ लोचा है', 'मस्तीजादे' , वन नाइट स्टँड या चित्रपटांमध्ये झळकली आहे. 

टॅग्स :सनी लिओनीबॉलिवूडसेलिब्रिटी