Join us

सनी लिओननं घेतला स्टँप ड्युटीत सूट दिल्याचा लाभ; मुंबईत खरेदी केलं १६ कोटींचं घर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 08:40 IST

Coronavirus : कोरोना महासाथीच्या काळात बांधकाम व्यवसायाला पुन्हा चालना देण्यासाठी राज्य सरकारनं जाहीर केली होती विशेष योजना

ठळक मुद्देकोरोना महासाथीच्या काळात बांधकाम व्यवसायाला पुन्हा चालना देण्यासाठी राज्य सरकारनं जाहीर केली होती विशेष योजनामुंबईतील अंधेरी परिसरात खरेदी केलं घर

कोरोनाच्या महासाथीचा देशाच्या आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला होता. अनेक क्षेत्रांवर याचा मोठा परिणामही झाला होता. तर दुसरीकडे देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर राज्यात बांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य सरकारनं घर खरेदीदारांसाठी स्टँप ड्युटीमध्ये मोठी सूट जाहीर केली होती. ३१ मार्च रोजी या योजनेचा अखेरचा दिवस होता. दरम्यान, या योजनेचा लाभ घेत अभिनेत्री सनी लिओन हीनं मुंबईतील अंधेरी परिसरात मोठं घर खरेदी केलं आहे. सरकारनं स्टँप ड्युटीमध्ये सूट जाहीर केल्यानंतर राज्यातील अनेक लोकांनी या योजनेचा लाभ घेतला होता. सनी लिओननं अंधेरी पश्चिम येथे एका आलिशान इमारतीतल १२ व्या मजल्यावर अपार्टमेंट रजिस्टर केलं. २८ मार्च २०२१ रोजी तिनं या अपार्टमेंटची १६ कोटी रूपयांना खरेदी केली होती. मनी कंट्रोलनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं घर खरेदीवर आकारल्या जाणाऱ्या स्टँप ड्युटीचे दर कमी करून ३ टक्के केले होते. ३१ मार्च रोजी या योजनेचा अखेरचा दिवस होता. याच योजनेचा लाभ घेत सनी लिओननं २८ मार्च रोजी आपल्या घराची नोंदणी केली. स्टँप ड्युटीत देण्यात आलेली सूट पकडून तिनं तब्बल ४८ लाख रूपयांचा भरणा केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तिनं अंधेरी पश्चिमेकडे असलेल्या अटलांटिस नावाच्या इमारतीत १२ व्या मजल्यावर एक घर खरेदी केलं. हा एक ५ बीएचके असून त्याचा कार्पेट एरिया ३,९६७ चौरस फूट इतका आहे. यासोबत अपार्टमेंटमध्ये तीन पार्किगच्या जागादेखील आहेत. या अपार्टमेंटची किंमत जवळपास ४० हजार रूपये प्रति चौरस फूट इतकी आहे जे बाजार मूल्य आहे. हा प्रोजेक्ट क्रिस्टल ग्रुपच्या टीयर २ बिल्डरद्वारे उभारण्यात आला आहे आणि तो दोन एकरमध्ये पसरलेला आहे अशी माहिती स्थानिक ब्रोकरनं मनी कंट्रोलशी बोलताना दिली. 

टॅग्स :बॉलिवूडसनी लिओनीमुंबईमहाराष्ट्रसुंदर गृहनियोजनकोरोना वायरस बातम्या