Join us
Daily Top 2Weekly Top 5

'ही' बॉलिवूड अभिनेत्री ठरली फेसबुकवर ‘मोस्ट एंगेजिंग एक्ट्रेस’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 19:48 IST

या अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये खूपच कमी हिट चित्रपट दिले असले तरी तिच्या हॉट अदांसाठी ती ओळखली जाते.

ठळक मुद्देसोशल मीडिया अपडेट्स आणि ट्रेंडी लुक्सच्यामूळे सनीने चाहत्यांवर मोहिनी घातलेली दिसून येतेय. स्कोर ट्रेंड्स इंडियानुसार, फेसबुकवर ‘मोस्ट एंगेजिंग एक्ट्रेस’ बनलेल्या सनी लियोनीने 100 गुणांसह बाकी सर्व बॉलीवुड अभिनेत्रींना मागे टाकून नंबर वन स्थान पटकावले आहे

फेसबुकवर 23 मिलियन फॉलोअर्स असलेली सनी लियोनी बॉलीवुडची सर्वाधिक एंगेजिंग अभिनेत्री बनलीय. आपल्या सोशल मीडिया अपडेट्स आणि ट्रेंडी लुक्सच्यामूळे सनीने आपल्या चाहत्यांवर मोहिनी घातलेली दिसून येतेय. स्कोर ट्रेंड्स इंडियानुसार, फेसबुकवर ‘मोस्ट एंगेजिंग एक्ट्रेस’ बनलेल्या सनी लियोनीने 100 गुणांसह बाकी सर्व बॉलीवुड अभिनेत्रींना मागे टाकून नंबर वन स्थान पटकावले आहे.  

सनी लियोनीनंतर अभिनेत्री अनुष्का शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. फेसबुकवर 9.8 मिलियन फोलोवर्स असलेल्या अनुष्का शर्माचे विराट कोहलीसोबतच्या व्हेकेशनच्या फोटोंना आणि अपडेट्सना चाहत्यांची पसंती मिळाली आहे आणि त्यामुळेच 73.22 गुणांसह अनुष्का दुसरी मोस्ट एंगेजिंग बॉलीवुड एक्टेस बनली आहे. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट बनवली आहे.

सनी लियोनीचे दुबई टूरचे फोटो आणि व्हिडीयोज तसेच कुटुंबियांसोबतच फोटो, स्टाइलिश फोटोशूट्स आणि डान्स रिहर्सल्सचे व्हिडीयो यामूळे सनीच्या चाहत्यांची तिच्या फेसबुक अकाऊंटवर एंगेजमेंन्ट वाढलेली दिसून आलीय. अनुष्काच्या भूतान ट्रिपच्या फोटोंना तिच्या आणि विराटच्या चाहत्यांची पसंती मिळालेली दिसून आलीय.  

फेसुबकवर 40 मिलियन फॉलोअर्स असलेल्या प्रियंका चोप्राला 60.72 गुण मिळाले असून तिने तिसरे स्थान पटकावले आहे. काही दिवसांसाठी दिल्लीत आलेल्या प्रियंकाचे फेसबुकवर कमी अपडेट्स पाहायला मिळाले. तर फेसबुकवर 14 मिलियन फॉलोअर्स असलेल्या कॅटरीना कैफचे वोग मैगजिनसाठी केलेले हॉट फोटोशूट आकर्षण ठरले आणि त्यामूळेच 58.42 गुणांसह ती लोकप्रियतेत चौथ्या क्रमांकावर आहे. 23 मिलियन फोलोअर्स असलेल्या सोनाक्षी सिन्हाच्या दबंग टूरच्या अपडेट्समूळे ती मोस्ट एंगेजिंग सेलिब्रिटींमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे.

 

टॅग्स :सनी लिओनीकतरिना कैफप्रियंका चोप्राअनुष्का शर्मासोनाक्षी सिन्हा