Join us
Daily Top 2Weekly Top 5

इशा-आहाना इतक्याच सुंदर दिसतात सनी देओलच्या सख्ख्या बहिणी; पाहा भावंडांचा 'हा' फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 13:30 IST

Sunny deol: धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या लेकी इशा देओल आणि आहाना देओल या दोघींविषयी प्रत्येकालाच ठावूक आहे.

ठळक मुद्देअजेता आणि विजेता असं या दोघींचं नाव असून त्या कलाविश्वापासून दूर आहेत.

संवादफेक कौशल्य आणि साहसदृश्यांमुळे प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता म्हणजे सनी देओल (Sunny Deol). गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या सनी देओलचा आज ६५ वा वाढदिवस. १९ ऑक्टोबर १९५६ रोजी पंजाबच्या (punjab) साहनेवाल येथे जन्म झालेला सनी देओल आज कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. रुपेरी पडद्यावर कायम आक्रमक भूमिका साकारणारा सनी खऱ्या आयुष्यात प्रचंड शांत आणि संयमी असल्याचं सांगण्यात येतं. सनी देओल यांच्या कुटुंबाविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे. मात्र, त्यांच्या दोन सख्ख्या बहिणींविषयी फार कमी जणांना माहित आहे.

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या लेकी इशा देओल आणि आहाना देओल या दोघींविषयी प्रत्येकालाच ठावूक आहे. परंतु, या दोघींव्यतिरिक्त धर्मेंद्र यांना आणखीन दोन लेकी आहे. अजेता आणि विजेता असं या दोघींचं नाव असून त्या कलाविश्वापासून दूर आहेत.

अजेता आणि विजेता या दोघी सनी देओल व बॉबी देओलच्या सख्या बहिणी आहे. काही दिवसांपूर्वीच बॉबी देओलने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोमध्ये चारही सख्खी भावंड दिसून येत होती. 

अजेता आणि विजेता कॅलिफोर्नियामध्ये स्थायिक असून त्या फार क्वचित मुंबईमध्ये येतात. विशेष म्हणजे फॅमिली फंक्शनमध्येदेखील त्या क्वचितच दिसून येतात. अजेताने किरण चौधरी यांच्यासोबत लग्न केलं आहे. किरण चौधरी लेखक असून त्यांनी '1000 Decorative Designs from India' हे पुस्तक लिहिल्याचं म्हटलं जातं. तर विजेता, अजेतासोबत तिच्याच घरी राहत असल्याचं सांगण्यात येतं. 

दरम्यान, अजेता आणि विजेता या धर्मेद्र यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांच्या मुली आहेत. तर इशा आणि आहाना या हेमा मालिनी यांच्या लेकी आहेत. त्यामुळे बॉबी व सनी यांना चार बहिणी आहेत. परंतु, प्रकाश कौर आणि त्यांच्या दोन्ही लेकी कायम प्रकाशझोतापासून दूर असतात. धर्मेंद्र यांनी विजेताच्या नावाने एक प्रोडक्शन हाऊस सुरु केलं असून विजेता प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड असं त्यांच्या कंपनीचं नाव आहे.

टॅग्स :सनी देओलबॉलिवूडसेलिब्रिटी