Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुनील ग्रोव्हर आणि शिल्पा शिंदेचा हॉट रेन डान्स व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2018 14:19 IST

महत्वाची बाब म्हणजे ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरत आहे. या जोडीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात चांगलाच गाजत आहे. 

मुंबई : बिग बॉस 11 ची विजेती शिल्पा शिंदे सध्या कॉमेडियन सुनील ग्रोव्हरसोबत 'धन धना धन' या शोमध्ये दिसत आहे. या शोमध्ये दोघे कपल म्हणून बघायला मिळत आाहे. महत्वाची बाब म्हणजे ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरत आहे. या जोडीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात चांगलाच गाजत आहे. 

सुनील ग्रोव्हर आणि शिल्पा शिंदे या व्हिडीओत रोमॅंटिक डान्स करताना दिसत आहे. शिल्पा शिंदे लाल रंगाच्या साडीत हॉट रेन डान्स करताना दिसत आहे. या डान्समधील दोघांची केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना चांगलीच पसंत पडत आहे. दोघे या व्हिडीओत 'सांसो को सासों मे' या गाण्यावर हा डान्स करत आहेत. 

 

'धन धना धन' या शोमुळे दोघेही गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. या शोमधील दोघांच्या रेट्रो लूकने चांगलीच वाह वाह मिळवली आहे. आता हा डान्स धुमाकूळ घालतो आहे. 

टॅग्स :सुनील ग्रोव्हरशिल्पा शिंदे