Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुनील बर्वे लवकरच होणार आजोबा!, लेकीच्या डोहाळे जेवणाचे फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 17:13 IST

Sunil Barve will soon be a grandfather : सध्या अभिनेता सुनील बर्वेच्या घरी आनंदाचं वातावरण आहे. तो लवकरच आजोबा होणार आहे. त्याची लेक सानिका लवकरच आई होणार आहे. तिचे डोहाळं जेवण नुकतेच पार पडले.

मराठी सिनेइंडस्ट्रीतला सगळ्यात देखणा नट म्हणून आजही लोकप्रिय असलेला अभिनेता म्हणजे सुनील बर्वे. मराठीसह हिंदी, गुजराथीमध्ये काम करणाऱ्या सुनील बर्वेची त्याकाळी तुफान क्रेझ होती.  विशेष म्हणजे आजही त्याची लोकप्रियता तितकीच आहे. सध्या अभिनेत्याच्या घरी आनंदाचं वातावरण आहे. तो लवकरच आजोबा होणार आहे. त्याची लेक सानिका लवकरच आई होणार आहे. तिचे डोहाळं जेवण नुकतेच पार पडले. या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

सुनील बर्वेची लेक सानिका हिचे डोहाळे जेवण नुकतेच मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात पार पडले. यावेळी सानिकाने हिरव्या रंगाची काठपदरी साडी नेसली होती आणि त्यावर फुलांचे दागिने घातले आहेत. तिच्या नवऱ्याने डार्क हिरव्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. त्यांनी खूप छान पोझमध्ये फोटोशूट केले.

सानिकाच्या डोहाळे जेवणाला सिनेइंडस्ट्रीतील काही कलाकारांनी हजेरी लावली होती. अभिनेत्री वंदना गुप्ते, अभिनेता पुष्कर श्रोत्री, सचिन खेडेकर, चंद्रकांत कुलकर्णी यांनी उपस्थिती लावली होती. 

२०२१ साली सानिकाचे लग्न झाले होते. लग्नानंतर आता ती लवकरच आई होणार आहे. त्यामुळे सुनील बर्वे आजोबा होणार आहेत. या आनंदाच्या क्षणामुळे बर्वे कुटुंबात आनंदाला उधाण आले आहे. 

वर्कफ्रंटदरम्यान, सुनील बर्वे आजही सिनेइंडस्ट्रीत सक्रीय आहे. त्याने 'आई', 'गोजिरी', 'जमलं हो जमलं', 'तू तिथे मी', 'लपंडाव', 'अस्तित्व', 'लग्नाची बेडी', 'झोपी गेलेला जागी झाला', 'श्रीयुत गंगाधर टिपरे', 'सहकुटुंब सहपरिवार' यांसारख्या अनेक नाटक, मालिका, सिनेमांमध्ये काम केलं आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sunil Barve to Become Grandfather Soon; Daughter's Baby Shower Photos

Web Summary : Actor Sunil Barve's daughter, Sanika, is expecting, and photos from her baby shower are circulating online. Celebrities like Vandana Gupte attended the joyous occasion. The Barve family is celebrating the upcoming arrival.
टॅग्स :सुनील बर्वे