Join us

Hunter Trailer Release: अण्णा इज बॅक...! सुनील शेट्टीचा जबरदस्त ॲक्शन अवतार, हंटरचा ट्रेलर पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 15:51 IST

Hunter Trailer Release: सुनीलची एक ॲक्शन पॅक्ड थ्रीलर सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. या सीरिजचं नाव आहे, हंटर - टूटेगा नहीं तोड़ेगा. तूर्तास या सीरिजचा ट्रेलर रिलीज झालाये...

Hunter Trailer Release: सुनील शेट्टी (Suniel Shetty) म्हणजे बॉलिवूडचा अण्णा. त्याचं नाव घेतलं की, डोळ्यासमोर येतो तो हेराफेरी मधला श्याम, धडकन मधला देव, बॉर्डर मधला भैरव सिंग. लवकरच सुनील शेट्टी हेराफेरी ३ मध्ये दिसणार आहे. पण त्याआधी सुनीलची एक ॲक्शन पॅक्ड थ्रीलर सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. या सीरिजचं नाव आहे, हंटर - टूटेगा नहीं तोड़ेगा. तूर्तास या सीरिजचा ट्रेलर रिलीज झालाये आणि हा ट्रेलर पाहून अण्णाचे चाहते एकदम क्रेझी झाले आहेत.

सीरिजमध्ये अण्णा एसीपी विक्रम सिन्हाच्या भूमिकेत आहे. जो पैशांच्या बदल्यात कोणत्याही बेपत्ता व्यक्तीला शोधू शकतो. याचदरम्यान काही अज्ञात लोक त्याला मुंबईच्या अंधाऱ्या गुन्हेगारी जगात घेऊन जातात. एका बेपत्ता महिलेचा शोध घेता घेता तो त्याचा भूतकाळ व भविष्यकाळाच्या गर्तेत अडकतो. ट्रेलरची सुरूवातच एका गुंत्यापासून होते. एसीपी आपल्या दोन मुलींसोबत खेळताना दिसतो. पण आपलं आयुष्य इतकं आनंदी कसं राहू शकतं, ही जाणीव त्याला छळत असते. यानंतर संपूर्ण ड्रामा सुरू होतो. एक पोलिस अधिकारी एका रात्री खुनी ठरतो. 

सुनील शेट्टीचे कॉमेडी सिनेमे लोकांनी डोक्यावर घेतले. पण आजही त्याचे चाहते त्याला ॲक्शन रोलमध्ये पाहणंच पसंत करतात. त्यामुळेच हंटरचा ट्रेलर रिलीज होताच चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. शेट्टी अन्ना इज बॅक, अशा कमेंट्स चाहते करत आहेत. 

या सीरिजमध्ये ईशा देओल पत्रकाराच्या भूमिकेत आहे. याशिवाय बरखा बिष्ट, राहुल देव, मिहिर आहुजा, टीना सिंह, चाहत तेजवानी, करणवीर शर्मा, सिद्धार्थ खेर, गार्गी सावंत, पवन चोप्रा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. येत्या २२ मार्चला ॲमेझॉन मिनीटीव्हीवर ही सीरिज रिलीज होतेय. विशेष म्हणजे ही सीरिज प्रेक्षकांना फ्रीमध्ये पाहता येणार आहे. यासाठी कुठल्याही सब्स्क्रिप्शनची गरज नाही.

टॅग्स :सुनील शेट्टीवेबसीरिज