Join us
Daily Top 2Weekly Top 5

'फक्त पैशांसाठी करत होते सहन', कपिल शर्माच्या 'त्या' वर्तणूकीबाबत सुमोना चक्रवर्तीचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2021 20:18 IST

अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीला 'द कपिल शर्मा' शोमधून भलेही प्रसिद्धी आणि पैसे मिळत असले तरी ती फारशी खूश नव्हती.

अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती हिने छोट्या पडद्यावर अनेक मालिकांमध्ये विविध भूमिका साकारल्या. मात्र तिला खरी ओळख द कपिल शर्मा शोमधून मिळाली. मात्र या शोमधून भलेही तिला प्रसिद्धी आणि पैसे मिळत असले तरी ती फारशी आनंदी नव्हती. मात्र कपिलच्या विनोदांमुळे तिचा आत्मसन्मान सातत्याने दुखावला जात होता. अशावेळी सुमोनाची खूप घुसमट व्हायची. याबद्दल तिनेच एका मुलाखतीत खुलासा केला होता.

सुमोना चक्रवर्तीने काही वर्षांपूर्वी अभिनेता राजीव खंडेलवालला दिलेल्या मुलाखातीत आपल्या करिअरवर भाष्य केले होते. त्यावेळी तिने द कपिल शर्मा शोमध्ये तिला आलेल्या अनुभवाबद्दल सांगितले. कपिल शर्मा अनेकदा तुझ्या शरीरावर कमेंट करायचा. तुझे ओठ बदकासारखे आहेत अशी खिल्ली उडवायचा. त्यावेळी तुला कसे वाटायचे? असा प्रश्न राजीवने सुमोनाला केला होता.

त्यावर उत्तर देताना सुमोना म्हणाली की, सुरुवातीला मला खूप वाईट वाटायचे. मी एकटी असताना यावर विचार देखील करायचे. अशा प्रकारच्या विनोदांमुळे माझा आत्मसन्मान दुखावला जात होता. मग मी अशा वेळी कपिल शर्माला मनातल्या मनात शिव्या घालून आपला राग व्यक्त करायचे. त्यामुळे माझी घुसमट होणे थांबले.

कालांतराने मला याची सवय झाली. कदाचित मला त्याचेच पैसे मिळत होते. त्यामुळे मी याबाबत मी तक्रार केली नाही. याला बॉडी शेमिंग म्हणायचे की नाही? याबाबत आजही माझा गोंधळ आहे. त्यामुळे याबाबत मी विचार करणे आता थांबवले आहे.

टॅग्स :सुमोना चक्रवर्तीकपिल शर्मा द कपिल शर्मा शो