Join us
Daily Top 2Weekly Top 5

A Suitable Boy :  या सीरिजमध्ये दिसणार इशान खट्टर व तब्बूचा ऑनस्क्रीन रोमान्स, पाहा नवा ट्रेलर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2020 14:19 IST

गेल्या अनेक दिवसांपासून या सीरिजची चर्चा रंगलीय. कारण काय तर इशान खट्टर यात स्वत:पेक्षा दुप्पट वयाची अभिनेत्री तब्बूसोबत ऑनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे.

ठळक मुद्देआज नेटफ्लिक्सवर A Suitable Boy चा ट्रेलर रिलीज झाला. ट्रेलरमध्ये इशान व तब्बू यांचे काही बोल्ड सीन्स आहेत.

विक्रम सेठ यांच्या A Suitable Boy या गाजलेल्या कादंबरीवर आधारित मीरा नायर यांची याच नावाची वेबसीरिज नेटफ्लिक्सवर रिलीजसाठी तयार आहे. या सीरिजची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा रंगलीय. कारण काय तर अभिनेता इशान खट्टर यात स्वत:पेक्षा दुप्पट वयाची अभिनेत्री तब्बूसोबत ऑनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. तूर्तास या सीरिजचा ट्रेलर रिलीज झाला आहे आणि या ट्रेलरवर चाहत्यांच्या उड्या पडताहेत.

आज नेटफ्लिक्सवर A Suitable Boy चा ट्रेलर रिलीज झाला. ट्रेलरमध्ये इशान व तब्बू यांचे काही बोल्ड सीन्स आहेत. ही वेबसीरिज चार कुटुंबाची कथा आहे. 19 वर्षांची लता तिचा वर स्वत: निवडू इच्छिते. तिची आई आपल्या लेकीसाठी सुयोग्य वराच्या शोधात आहे. दुसरीकडे मान कपूर (इशान खट्टर) सईदा बाईच्या प्रेमात आकंठ बुडाला आहे. सीरिजमध्ये विनय पाठक, राम कपूर, रणवीर शौरी, रणदीप हुड्डा, मनोज पाहवा यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांच्याही भूमिका आहे. मीरा नायर या सीरिजच्या दिग्दर्शिका आहेत.मीरा नायर यांना सलाम बॉम्बे, मॉन्सून वेडिंग आणि द नेमसेकसारख्या आंतरराष्ट्रीय सिनेमांसाठी ओळखले जाते.  

 

  या विवाहित अभिनेत्याच्या प्रेमात वेडी झाली होती तब्बू, त्याच्या शेजारी घेतले होते घर

इशान म्हणतो, हे एक सुंदर नातंतब्बूसोबत बोल्ड सीन्स देण्याबद्दल इशान अलीकडे एका मुलाखतीत बोलला होता. ‘हे आजच्या काळातील एक असहज नातं आहे. कथेत एक बोल्ड सीन आहे. ती एक मुस्लिम वेश्या आहे आणि एक हिंदू परिवारातील एका मंत्र्याचा मुलगा आहे. तो जवळपास तिच्यापेक्षा अर्ध्या वयाने लहान आहे. पण हे एक फार सुंदर नातं आहे,’ असे इशानने सांगितले होते.शूटींग सुरू होण्याआधी त्याने भूमिका व्यवस्थित समजून घेण्यासाठी कादंबरी वाचली होती,असेही त्याने सांगितले होते.

In Pics: वयाच्या मर्यादा विसरून या स्टार्सनी पडद्यावर केला रोमान्स, पाहाल तर थक्क व्हाल

OMG! तब्बू, तापसी, अनुष्का... या सेलिब्रिटींचा ‘सर्च’ पडू शकतो महागात!!

टॅग्स :इशान खट्टरतब्बू