शाहरुख खानची लेक सुहाना खान (Suhana Khan) आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा (Agastya Nanda). दोघांनी 'द आर्चीज' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. दोघंही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. अनेकदा पार्टी, इव्हेंटसाठी दोघंही एकत्र दिसून येतात. काही दिवसांपूर्वीच दोघंही न्यू इयर सेलिब्रेशनसाठी अलिबागला गेले होते. त्यांचा जेट्टीवरील व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता न्यू इयर पार्टीमधील त्यांचे काही फोटो समोर आलेत.
शाहरुख खानने लेक सुहानाच्या नावावर अलिबाग येथे आलिशान फार्म हाऊस घेतलं होतं. नुकतंच शाहरुखही सुहाना, अगस्त्य आणि कुटुंबासोबत अलिबागवरुन परतला. त्यांनी फार्महाऊसवर नवीन वर्षाचं जंगी स्वागत केलं. आता या पार्टीतील काही फोटो समोर आलेत. अगस्त्य नंदाच्या फॅन पेजवर हे फोटो आहेत. यामध्ये अगस्त्य आणि सुहाना त्यांच्या मित्रांसोबत ग्रुप फोटोत दिसत आहेत. सुहानाने व्हाईट मोनोकॉनी वनपीस घातला आहे. यामध्ये ती एकदम हॉट लूकमध्ये दिसत आहे. तर आणखी एका फोटोत अगस्त्य आणि सुहाना पाठमोरे आहेत. लाईटिंगजवळचा उभे असतानाचा त्यांचा हा फोटो खूपच सुंदर आला आहे.
अगस्त्य आणि सुहानाच्या रिलेशनशिपच्या चर्चा आता आणखी जोर धरुन आहेत. 'द आर्चीज' सिनेमातही त्यांची केमिस्ट्री पसंत केली गेली. सिनेमात त्यांचा किसींग सीनही होता. अगस्त्याच्या निरागस अभिनयावर तर प्रेक्षक फिदा झाले होते. आता तो श्रीराम राघवनच्या आगामी 'इक्कीस' सिनेमात दिसणार आहे. तर सुहाना खान शाहरुखसोबतच 'किंग' सिनेमात झळकणार आहे. बापलेकीची जोडी पहिल्यांदाच पडद्यावर दिसणार आहे. यामध्ये अभिषेक बच्चन आणि 'मुंज्या'फेम अभिनेता अभय वर्माचीही भूमिका आहे.