Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुबोध भावेने इन्स्टाग्रामवर शेअर केला काशिनाथ घाणेकर चित्रपटाच्या लूक टेस्टचा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 12:14 IST

‘आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटात सुबोध हुबेहुब काशिनाथ घाणेकर यांच्यासारखाच दिसत असल्याचे त्याच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. त्याने नुकताच या चित्रपटातील त्याच्या भूमिकेच्या लूक टेस्टचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

ठळक मुद्देसुबोधने या फोटोच्या कॅप्शनसोबत लिहिले आहे की, तुमचं भविष्य तुमच्या विचारात असतं आणि ते घडवायची ताकद तुमच्या मनगटात. स्वतःवर विश्वास ठेव आणि एक पाऊल पुढे टाक... (घाणेकर सिनेमाच्या पहिल्या लूक टेस्टचा फोटो)... हा फोटो सुबोधच्या चाहत्यांनी अक्षरशः डोक्यावर घडॉ. काशिनाथ घाणेकर यांचा लुक, संवाद फेक, अस्वस्थता, बिनधास्तपणा, बेफिकीरीपणा, त्यांचे अभिनयाबद्दलचे वेड हे अतिशय उत्तमप्रकारे सुबोध भावेने त्याच्या अभिनयाद्वारे पडद्यावर साकारले आहे आणि हेच प्रेक्षकांच्या पसंतीस देखील पडत आहे.

वायकॉम18 मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटाच्या टीझरपासून चित्रपटामधील संवाद, गाणी यांची चर्चा प्रेक्षकांमध्ये सुरू झाली होती. नुकताच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे आणि अगदी पहिल्या दिवसापासून, पहिल्या शो पासून या चित्रपटाला प्रेक्षकांचा एकदम कडक रिस्पोन्स मिळतो आहे. चित्रपटामध्ये डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या उदय – अस्ताचा प्रवास दाखविण्यात आला आहे. 

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता सुबोध भावेने डॉ. काशिनाथ घाणेकर यांची भूमिका साकारली असून तो ही व्यक्तिरेखा जगला आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा लुक, संवाद फेक, अस्वस्थता, बिनधास्तपणा, बेफिकीरीपणा, त्यांचे अभिनयाबद्दलचे वेड हे अतिशय उत्तमप्रकारे सुबोध भावेने त्याच्या अभिनयाद्वारे पडद्यावर साकारले आहे आणि हेच प्रेक्षकांच्या पसंतीस देखील पडत आहे. या चित्रपटात सुबोध हुबेहुब काशिनाथ घाणेकर यांच्यासारखाच दिसत असल्याचे त्याच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. त्याने नुकताच या चित्रपटातील त्याच्या भूमिकेच्या लूक टेस्टचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या त्याच्या फोटोला त्याच्या फॅन्सचा खूपच छान प्रतिसाद मिळत आहे. त्याने या फोटोच्या कॅप्शनसोबत लिहिले आहे की, तुमचं भविष्य तुमच्या विचारात असतं आणि ते घडवायची ताकद तुमच्या मनगटात. स्वतःवर विश्वास ठेव आणि एक पाऊल पुढे टाक... (घाणेकर सिनेमाच्या पहिल्या लूक टेस्टचा फोटो)... हा फोटो सुबोधच्या चाहत्यांनी अक्षरशः डोक्यावर घेतला आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.

‘आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटामधील सोनाली कुलकर्णी, सुमित राघवन, मोहन जोशी, आनंद इंगळे, प्रसाद ओक, वैदेही परशुरामी, नंदिता धुरी यांच्या भूमिका देखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन अभिजीत देशपांडे यांनी केले आहे.

डॉ. काशिनाथ घाणेकर कसे होते? डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या आयुष्यातील रंगभूमीचे, नाटकाचे महत्त्व... उतरती कळा लागल्यानंतर त्यांनी कसा स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न केला... डॉ. काशिनाथ घाणेकर आणि इरावती घाणेकर तसेच डॉ. काशिनाथ घाणेकर आणि कांचन घाणेकर यांचा प्रवास... अशा विविध छटा उत्तम प्रकारे सुबोध भावेने या चित्रपटामध्ये साकारल्या आहेत. 

टॅग्स :सुबोध भावे आणि डॉ. काशिनाथ घाणेकर