Join us
Daily Top 2Weekly Top 5

'स्त्रीलिंग पुल्लिंग' वेबसीरिज फेम भाग्यश्री न्हालवे करणार प्रेमात कल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 19:50 IST

'बस बुलेटवर' या गाण्यात 'कुंकू टिकली आणि टॅटू' फेम आणि 'स्त्रीलिंग पुल्लिंग' या गाजलेल्या वेबसीरिजमधील भाग्यश्री न्हालवे आपल्या मस्तीभऱ्या अंदाजात थिरकताना दिसणार आहे.

अचूक शब्दांची किमया, ठेका धरायला लावणार संगीत, कलाकारांची भारी अदाकारी, सेट्स, कोरिओग्राफी या साऱ्यांची योग्य प्रमाणात सांगड घालणाऱ्या व्यक्तींमध्ये नाव घेता येईल ते म्हणजे चेतन गरुड प्रोडक्शन्सचे. सिंगल म्युझिक अल्बम्सच्या गणितातला हुकमी एक्का म्हणून गणल्या जाणाऱ्या चेतन गरुडची ही गरुडझेप वाखाणण्याजोगी आहे. 'खंडेराया झाली माझी दैना', 'सुरमई', 'आली फुलवली' आणि आता 'बस बुलेटवर' ह्या आगामी रोमॅंटिक सॉंगने मराठी म्युझिक इंडस्ट्रीत चेतन गरुड प्रोडक्शन्सने यशस्वी चौकारच मारला आहे. 'बस बुलेटवर' या गाण्यात 'कुंकू टिकली आणि टॅटू' फेम आणि 'स्त्रीलिंग पुल्लिंग' या गाजलेल्या वेबसीरिजमधील भाग्यश्री न्हालवे आपल्या मस्तीभऱ्या अंदाजात थिरकताना दिसणार आहे.

चेतन गरुड आणि एव्हरेस्ट एन्टरटेनमेन्ट यांच्या संयुक्तविद्यमाने 'बस बुलेटवर... मला आवळून धर... घालूया प्रेमात कल्ला' असे गमतीशीर शब्द असणाऱ्या या गाण्याची जादू तरुणाईला वेडावून सोडेल अशीच आहे. बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडच्या प्रेमातला कल्ला सांगणारे हे गीत लिहिले आहे अक्षय कर्डक यांनी तर त्याला साजेसे संगीत लाभले आहे अतुल भालचंद्र जोशी-सिद्धेश कुलकर्णी या द्वयींचे. विशेष म्हणजे गायक केवल जयवंत वाळंज यांनी आपल्या मस्तीभऱ्या गायकीने या गाण्यात खासच रंग भरलेत. तर बॉयफ्रें-गर्लफ्रेंडच्या भूमिकेत झळकणारे डॅक्स मॅथ्यू आणि भाग्यश्री एनएच यांनी 'बस बुलेटवर' गाण्यात एकच कल्ला उडवून दिला आहे. या गाण्याचे दिग्दर्शन केले आहे तेजस पाटील यांनी तर संकलन राहुल झेंडे यांनी केले आहे. शिवाय प्रेमाची बार उडवून लावणाऱ्या या गाण्याची दिलखेचक सिनेमॅटोग्राफी रवी उच्चे यांनी केली आहे.  डॅक्स मॅथ्यू यांचे नृत्य-दिगदर्शन आहे.

टॅग्स :भाग्यश्री न्हालवे