Join us

स्टार प्रवाहवरील ही लोकप्रिय मालिका घेणार निरोप, अन् नव्या मालिकेत दिसणार उर्मिला कानेटकर-कोठारे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 11:09 IST

स्टार प्नवाह वाहिनीवर दाखल होणाऱ्या नव्या मालिकेत अभिनेत्री उर्मिला कानेटकर कोठारे (Urmila Kanetkar-Kothare) महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवर लवकरच एक नवीन मालिका भेटीला येणार आहे. या मालिकेचे नाव आहे 'तुझेच मी गीत गात आहे'. ही मालिका २ मे पासून  रात्री ९ वाजता प्रसारीत होणार आहे. असे समजते आहे की 'मुलगी झाली हो' (Mulgi Jhali Ho) या मालिकेच्या जागी ही नवीन मालिका पाहायला मिळणार आहे. या मालिकेत अभिनेत्री उर्मिला कानेटकर कोठारे (Urmila Kanetkar-Kothare) पाहायला मिळणार असल्याचे बोलले जात आहे.  

स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार घेणार आहे. त्या जागी नवीन मालिका भेटीला येणार आहे. तुझेच मी गीत गात आहे असं या मालिकेचे नाव आहे. ही मालिका कुल्फी कुमार बाजेवालाचा हिंदी रिमेक असल्याचे म्हटले जात आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच समोर आला आहे. या प्रोमोत एक लहान मुलगी गाणी गाताना दिसते आहे. तिचे नाव स्वरा आहे. ती गाणे गात असताना तिथले गावकरी तुला सर्व प्रश्नांची उत्तरे माहित आहेत का?, त्यावर ती चिमुरडी म्हणते हो विचारून बघा. त्यावर ते गावकरी बोलतात, तुझ्या वडिलांचे नाव सांग. त्यावर स्वराकडे उत्तर नसते. त्यामुळे ती गप्प बसते.

दरम्यान या मालिकेत मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कानेटकर-कोठारे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे समजते आहे. मात्र अद्याप या वृत्ताबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे ती कोणत्या भूमिकेत पाहायला मिळणार हे देखील अद्याप गुलदस्त्यात आहे. तिचे चाहते तिच्या भूमिकेबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. 

उर्मिला कानेटकर- कोठारे ही मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. काही दिवसांपूर्वी ती सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत पाहुणी कलाकार म्हणून पाहायला मिळाली होती. तिने या मालिकेत परिक्षकाची भूमिका साकारली होती.

टॅग्स :उर्मिला कानेटकर कोठारेस्टार प्रवाह