'पुष्पा २' (Pushpa 2 Movie) अखेर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी जबरदस्त ओपनिंग करून सर्व चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. 'पुष्पा २' चित्रपटाच्या ग्रॅण्ड ओपनिंगदरम्यान, 'श्रीवल्ली' देखील काही खास लोकांसह चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी आली होती. डेटिंगच्या अफवांच्या दरम्यान, रश्मिका मंदाना(Rashmika Mandanna)ने विजय देवरकोंडा(Vijay Devarkonda)च्या कुटुंबासह थिएटरमध्ये 'पुष्पा २'चा आनंद लुटला. तिचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अभिनेत्रीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होता ज्यामध्ये रश्मिका हैदराबादमधील एका थिएटरमध्ये दिसली होती. तिच्यासोबत विजय देवरकोंडाची आई माधवी देवराकोंडा आणि त्याचा भाऊ आनंद देवरकोंडा हे देखील होते. मात्र, विजय फोटोत दिसत नाही. पण हा फोटो व्हायरल झाल्यानंतर रश्मिका आणि विजयच्या डेटिंगच्या अफवांना वेग आला आहे आणि हा फोटो पाहून ते दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याचे नेटकरी बोलत आहेत. बरं, या दोघांच्या डेटिंगच्या चर्चा बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. मात्र, रश्मिका किंवा विजय या दोघांनीही त्यांच्या नात्याला दुजोरा किंवा खंडन केले नाही.
'पुष्पा २: द रुल'बद्दल बोलायचे झाले तर रश्मिका मंदानाने या चित्रपटात 'श्रीवल्ली'च्या भूमिकेतून पुनरागमन केले आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुनही पुष्पा राजच्या भूमिकेत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याच्या एक दिवस आधी, रश्मिकाने तिच्या इंस्टाग्रामवर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक मोठी पोस्ट लिहिली होती. अभिनेत्रीने लिहिले होते की, “पुष्पा २ उद्या रिलीज होत आहे आणि सध्या मी भावनांनी भरलेली आहे. स्वतःला या टीमशी आणि चित्रपटाशी इतके प्रभावित आणि वैयक्तिकरित्या जोडलेले पाहून खूप आनंद झाला आहे. मी याआधी कधीही माझ्या भावनांवर परिणाम होऊ दिला नाही आणि आज रिलीजच्या पूर्वसंध्येला मला त्या भावना पुन्हा जाणवत आहेत याआधी कोणत्याही चित्रपटासाठी वाटले नव्हते."