Join us
Daily Top 2Weekly Top 5

श्रीदेवी यांची ही इच्छा पूर्ण केली बोनी कपूर यांनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2019 15:06 IST

मी माझी पत्नी श्रीदेवीची एक इच्छा पूर्ण केली असे बोनी कपूर यांनी नुकतेच सांगितले आहे.

ठळक मुद्देमी तमीळ चित्रपटाची निर्मिती करावी अशी तिची नेहमीच इच्छा होती. तिची ही इच्छा तिच्या जिवंतपणी मला पूर्ण करता आली असती तर... पण आता तिची ही इच्छा मी पूर्ण केली आहे.

श्रीदेवी यांच्या निधनानंतर वर्षभरानंतर त्यांचे पती बोनी कपूर यांनी त्यांची एक इच्छा पूर्ण केली आहे. बोनी कपूर यांची निर्मिती असलेला नेरकोंडा र्पवई हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट पिंक या अमिताभ बच्चन, तापसी पन्नू यांच्या गाजलेल्या पिंक या चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटाच्या प्रमोशच्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत मी माझी पत्नी श्रीदेवीची एक इच्छा पूर्ण केली असे बोनी कपूर यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे.

श्रीदेवी यांच्याबद्दल बोलताना बोनी भावुक झाले होते. ते सांगतात, माझा चित्रपट खूपच चांगला बनवण्यात आला असल्याने मी प्रचंड खूश आहे. पण या सगळ्यात मी माझ्या पत्नीला सगळ्यात जास्त मिस करत आहे. मी तमीळ चित्रपटाची निर्मिती करावी अशी तिची नेहमीच इच्छा होती. तिची ही इच्छा तिच्या जिवंतपणी मला पूर्ण करता आली असती तर... पण आता तिची ही इच्छा मी पूर्ण केली आहे.

पुढे ते सांगतात, श्री आणि तिच्या आईने एक तमीळ चित्रपटाची निर्मिती करायचा विचार केला होती. त्या चित्रपटाचा मुहूर्त देखील ठरला होता. पण काही कारणास्तव हा चित्रपट बनू शकला नाही. त्यानंतर देखील तमीळ चित्रपटाची निर्मिती करण्याचे तिच्या डोक्यात सुरू होते. मी दाक्षिणात्य भाषेतील चित्रपटांची निर्मिती करावी असे श्रीला वाटत होते आणि तिने त्याबद्दल मला अनेकवेळा सांगितले देखील होते. नेरकोंडा र्पवई या चित्रपटाद्वारे मला श्रीचे स्वप्न पूर्ण करता आले. दाक्षिणात्य इंडस्ट्रीचे मी नेहमीच आभार मानेन... या इंडस्ट्रीतील अनेक चित्रपटांचे मी रिमेक बनवले असून हे चित्रपट चांगलेच गाजले आहेत तसेच माझी पत्नीदेखील मला याच इंडस्ट्रीमुळे मिळाली.

या चित्रपटात अजित वकिलाची मुख्य भूमिका साकारत असून एका लैंगिक अत्याचाराची केस लढताना दिसणार आहे. पिंक या चित्रपटात ही भूमिका अमिताभ बच्चन यांनी साकारली होती. श्रीदेवी आणि अजित यांनी इंग्लिश विंग्लिश या चित्रपटाच्या तमीळ रिमेकमध्ये एकत्र काम केले होते. 

टॅग्स :श्रीदेवीबोनी कपूर