Join us
Daily Top 2Weekly Top 5

खुशी कपूरने आपल्या स्टाइलने वेधून घेतले सर्वांचं लक्ष, वारंवार पाहिले जातात तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2020 19:06 IST

खुशी कपूरच्या इन्स्टाग्रामवर 100K फॉलोअर्स आहेत. यापैकी ती केवळ 409 लोकांना फॉलो करते. खुशीच्या अकाऊंटवर तिची दिवंगत आई श्रीदेवी, वडील बोनी कपूर आणि मोठी बहीण जाह्नवी कपूर यांच्यासोबतचे काही फोटो आहेत.

सोशल मीडियावर चित्रपटसृष्टीतील सगळेच कलाकार खूप अॅक्टीव्ह असतात. त्यापाठोठ आता स्टार किडमध्ये खुशी कपूर सतत अॅक्टीव्ह असते. बघावं तेव्हा तिचे नवीन नवीन अॅक्टीव्हीटी करत असल्याचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. खुशी कपूरही दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची छोटी मुलगी आहे. तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत.वेस्टर्न असो ट्रेडिशनल तिचा प्रत्येक अंदाज लक्ष वेधून घेतो.खुशीने शेअर केलेल्या फोटो तिचे सौंदर्य आणखी खुलून आले आहे. आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत  नेहमीच जास्त सजग असते.

 

खुशी कपूरने नुकतेच सोशल मीडियावर आपले प्नायव्हेट अकाउंट पब्लिक केले आहे. त्यामुळे अल्पावधीतच खुशी कपूरच्या फॉलोअर्सच्या संख्येतही अधिक वाढ झाल्याचे पाहायला मिळते आहे. विशेष म्हणजे ग्लॅमर वर्ल्डमध्ये एंट्री करण्यापूर्वीच लोकप्रिय खुशी कपूर लोकप्रिय स्टारकिड बनली आहे. तिचे लाखोंहून चाहते  खुशीची मोठी बहीण यापूर्वीच ग्लॅमरच्या जगात दाखल झाली आहे आणि आता जान्हवी पाठोपाछ खुशीलाही झगमगत्या दुनियेत  पाऊल ठेवण्याची इच्छा आहे. 

नेहमीच तिच्या हटके आणि बोल्ड अंदाजातील फोटो पाहून चाहते फिदा होतात. वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी, बहिण जाह्नवीपेक्षा खुशी अधिक ग्लॅमरस आणि सुंदर दिसते. खुशी कपूरच्या अगोदर अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली आणि शाहरुखची मुलगी सुहाना खानने त्यांचे इन्स्टाग्राम अकाऊंट पब्लिक केल्याचे सांगितले होते. 

खुशीच्या इन्स्टाग्रामवर 100K फॉलोअर्स आहेत. यापैकी ती केवळ 409 लोकांना फॉलो करते. खुशीच्या अकाऊंटवर तिची दिवंगत आई श्रीदेवी, वडील बोनी कपूर आणि मोठी बहीण जाह्नवी कपूर यांच्यासोबतचे काही फोटो आहेत.  याशिवाय संजय कपूरची मुलगी शनाया कपूर आणि अर्जुन कपूर यांच्यासोबतही तिच्या फोटोंना पसंती मिळत आहे.

करन जोहरच्या टॉक शोमध्ये  जाह्नवीने सांगितले होते की, खुशीचे घरी खूप लाड केले जातात. वडील बोनी कपूर  अजूनही खुशीशी एक लहान मुलगी म्हणूनच तिचे लाड करतात.

टॅग्स :खुशी कपूरश्रीदेवी