Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्पृहा जोशी करणार सूत्रसंचालन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2018 12:50 IST

'सूर नवा ध्यास नवा'च्या पहिल्या सीझनची सूत्रसंचालक तेजश्री प्रधानची जागा स्पृहा घेणार आहे. 

ठळक मुद्दे 'सूर नवा ध्यास नवा' या रिएलिटी शोच्या दुसऱ्या सीझनला लवकरच सुरूवात होणार आहे.

नाटक, मालिका व चित्रपट अशा तिन्ही माध्यमात आपल्या अभिनयाने रसिकांना भुरळ पाडणारी अभिनेत्री स्पृहा जोशी सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. कलर्स मराठीवरील 'सूर नवा ध्यास नवा' या रिएलिटी शोच्या दुसऱ्या सीझनला लवकरच सुरूवात होणार आहे आणि यात स्पृहा सूत्रसंचालन करणार आहे. 'सूर नवा, ध्यास नवा' या सिंगिग रिएलिटी शोच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. हा कार्यक्रम सुरु झाला तेव्हा कार्यक्रमातील गायकांनी गायलेली विविध शैलींमधील गाणी अजूनही प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतात. एक आश्चर्याचा सुखद धक्का या गायकांनी कार्यक्रमाच्या प्रत्येक भागामध्ये कॅप्टनना तसेच प्रेक्षकांना दिला होता. या कार्यक्रमाला तसेच कार्यक्रमामधील स्पर्धकांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. आणि म्हणूनच सूर नवा ध्यास नवाच्या पहिल्या पर्वाच्या अभूतपूर्व यशानंतर “सूर नवा ध्यास नवा लिटिल चॅम्प्स” घेऊन आले आहेत. या पर्वामध्ये देखील उत्तमातून उत्तम सूर शोधण्याचा ध्यास असणार आहे. मात्र मंचावर लहान मुले असणार आहेत. ६ ते १५ वयोगटातील बच्चेकंपनी या कार्यक्रमात आपले टॅलेंट दाखवणार आहेत. या पर्वाचे परीक्षक अवधूत गुप्ते, शाल्मली खोलगडे आणि महेश काळे असणार आहेत.  तर पहिल्या सीझनची अँकर तेजश्री प्रधानची जागा स्पृहा घेणार आहे. तेजश्रीऐवजी तिला संधी देण्यामागे काय कारण आहे याची चर्चा सध्या सगळीकडे रंगली आहे. स्पृहाने यापूर्वी छोट्या पडद्यावर केलेल्या सर्व भूमिका गाजल्या होत्या. यापूर्वी 'किचनची सुपरस्टार' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही तिने केले होते. स्पृहा सूर नवा, ध्यास नवा या शोमधील सूत्रसंचालन कसे करते, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

टॅग्स :सूर नवा ध्यास नवास्पृहा जोशीतेजश्री प्रधान