Join us
Daily Top 2Weekly Top 5

Spruha Joshi VIDEO : स्पृहा साकारणार लोकमान्यांची पत्नी, भूमिकेसाठी अशी केली तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 18:42 IST

Spruha Joshi : दीर्घकाळापासून स्पृहा कोणत्याही मालिकेत झळकलेली नाही. पण आता चाहत्यांची प्रतीक्षा संपलीये. होय, स्पृहाची एका नव्या दमदार भूमिकेत छोट्या पडद्यावर दिसणार आहे.

मराठी अभिनेत्री, कवयित्री, सूत्रसंचालिका आणि युट्युबर अशा अनेक भूमिकांद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे स्पृहा जोशी (Spruha Joshi ). तिची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाहीच. दमदार अभिनयाच्या जोरावर स्पृहाने मनोरंजन सृष्टीत एक वेगळं असं स्थान निर्माण केलं आहे. अर्थात दीर्घकाळापासून स्पृहा कोणत्याही मालिकेत झळकलेली नाही. पण आता चाहत्यांची प्रतीक्षा संपलीये. होय, स्पृहाची एका नव्या दमदार भूमिकेत छोट्या पडद्यावर दिसणार आहे. येत्या 21 डिसेंबरपासून येऊ घातलेल्या ‘लोकमान्य’ या मालिकेत स्पृहा झळकणार आहे. ही मालिका बुधवार ते शनिवार रात्री साडेनऊ वाजता पाहता येणार आहे.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनावर आधारित ही नवीकोरी मालिका झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अभिनेता क्षितीश दाते या मालिकेत लोकमान्य टिळकांची भूमिका साकारतअसून टिळकांच्या पत्नीची भूमिका  स्पृहा जोशी जिवंत करणार आहे. 

या भूमिकेसाठी स्पृहा कशी तयार व्हायची? याची एक झलक स्पृहाने तिच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे.यात स्पृहा मेकअप रूममध्ये तयार होताना दिसतेय. नंतर ती फोटोशूट करताना दिसतेय. 

 स्पृहा जोशीने या आधी झी मराठीवरील ‘उंच माझा झोका’ मालिकेतील रमाबाई रानडे यांची भूमिका अजरामर करून ठेवली आहे. तिला आता पुन्हा ऐतिहासिक भूमिकेत पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे. त्यामुळे चाहते स्पृहा जोशीला पुन्हा छोट्या पडद्यावर ऐतिहासिक भूमिकेत पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.  टिळकांच्या राजकीय प्रवासाबरोबरच त्यांच्या कौटुंबिक आयुष्यातील महत्त्वाचे घटना-प्रसंग ‘लोकमान्य’ या मालिकेत पहायला मिळणार आहेत. टिळकांचा विवाह, त्यांचे महाविद्यालयीन जीवन, त्यांचे विविधांगी लेखन, राजकीय स्तरावरील त्यांच्या कारकिर्दीचे महत्त्वपूर्ण टप्पे या मालिकेतून प्रेक्षकांना पहायला मिळतील. 
टॅग्स :स्पृहा जोशीमराठी अभिनेताझी मराठीलोकमान्य टिळक