Join us  

एकावर एक तिकीट फ्री! श्रेयसच्या नवीन मराठी सिनेमासाठी खास ऑफर! करावी लागेल 'ही' गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 1:59 PM

श्रेयस तळपदे - गौरी इंगवलेच्या आगामी ही अनोखी गाठ सिनेमाची खास ऑफर कशी वापरायची जाणून घ्या

 श्रेयस तळपदे - गौरी इंगवले यांच्या 'ही अनोखी गाठ' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. या सिनेमात श्रेयस - गौरी पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत. 'ही अनोखी गाठ'चा ट्रेलर काहीच दिवसांपुर्वी रिलीज झाला. त्यानंंतर सर्वांना हा सिनेमा पाहण्याची उत्सुकता होती. अखेर 'ही अनोखी गाठ' सिनेमा उद्या १ मार्चला रिलीज होतोय. हा सिनेमा पाहण्यासाठी निर्मात्यांनी प्रेक्षकांना एकावर एक तिकीट फ्री अशी ऑफर दिलीय. 

'ही अनोखी गाठ' सिनेमाच्या निर्मात्यांनी नुकतीच घोषणा केलीय. एकावर एक तिकीट फ्री अशी ही ऑफर असून फक्त उद्या अर्थात १ मार्चपर्यंतच ही ऑफर लागू आहे. आपल्या माणसाच्या सोबतीने पाहा... अशी खास लाईन देऊन या ऑफरची घोषणा करण्यात आलीय. यासाठी प्रेक्षकांना बूक माय शोवर जाऊन HEAGBOGO हा कोड वापरुन ही ऑफर मिळवायची आहे.

महेश मांजेरकर दिग्दर्शित 'ही अनोखी गाठ' सिनेमा उद्या १ मार्चला संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होतोय. श्रेयस तळपदे - गौरी इंगवले सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत. शिवाय शरद पोंक्षे, रिशी सक्सेना, दीप्ती लेले, सुरभी भावे हे कलाकार सुद्धा 'ही अनोखी गाठ' मध्ये विशेष भूमिकेत आहेत. झी स्टूडियोज आणि मंगेश कुलकर्णींनी सिनेमाची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे.. श्रेयस तळपदेला काहीच दिवसांपुर्वी हार्ट अटॅक आला होता. त्यानंतर श्रेयसचा हा पहिलाच सिनेमा आहे.

टॅग्स :श्रेयस तळपदेमहेश मांजरेकर शरद पोंक्षे