Join us
Daily Top 2Weekly Top 5

राणाला मिळणार सखीकडून खास भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 07:15 IST

झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’या मालिकेने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. राणादा आणि पाठकबाई यांची निरागस,निखळ अशी प्रेमकथा प्रेक्षकांना प्रचंड आवडते

ठळक मुद्देमालिकेच्या आगामी भागात राणाचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे

झी मराठीवरीलतुझ्यात जीव रंगला’या मालिकेने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. राणादा आणि पाठकबाई यांची निरागस,निखळ अशी प्रेमकथा प्रेक्षकांना प्रचंड आवडते. राणादा आणि पाठकबाई यांच्यावर सबंध महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात. प्रेक्षकांचे प्रेम आणि पाठिंब्यामुळे या मालिकेने नुकताच ६०० भागांचा टप्पा पार केला.

ऑनस्क्रीन भोळा तसेच रांगडा दिसणारा पेहलवान पठ्ठा राणादा ऑनस्क्रीन अगदी खरा पेहलवान कुस्तीपटू दिसण्यासाठी त्याच्या फिटनेस आणि डाएटकडे खूप लक्ष देतो. सध्या मालिकेत राणा मॅटवरील कुस्तीचा सराव करत आहे आणि त्यासाठी त्याचा पल्ला एका लेडी मॅनेजरशी पडलाय. जीच्यासोबत राणा बोलायला पण लाजत होता त्या सखीसोबत राणाने आता चक्क मैत्री केली आहे. त्यांच्यात झालेल्या दोस्तीच्या कॉन्ट्रॅक्टनुसार राणा आता सखीशी मित्र म्हणून वागत आहे.

मालिकेच्या आगामी भागात राणाचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे. राणाच्या वाढदिवसानिमित्त अंजली त्याला एक छान ग्रिटींग कार्ड देते पण राणाला फक्त अंजलीकडूनच नाही तर सखीकडून देखील एक खास भेटवस्तू मिळणार आहे. सखी राणाला एक घड्याळ भेट म्हणून देणार आहे. सखी कडून भेट वस्तू मिळाल्यावर राणा देखील भारावून जाणार आहे.

ऑनस्क्रीन भोळा तसेच रांगडा दिसणारा पेहलवान पठ्ठा राणादा ऑनस्क्रीन अगदी खरा पेहलवान कुस्तीपटू दिसण्यासाठी त्याच्या फिटनेस आणि डाएटकडे खूप लक्ष देत आहे. सध्या मालिकेत राणा मॅटवरील कुस्तीचा सराव करत आहे आणि त्यासाठी त्याचा पल्ला एका लेडी मॅनेजरशी पडलाय आणि त्या दोघांची जुगलबंदी प्रेक्षक खूप एन्जॉय करत आहेत. प्रेक्षकांचे प्रेम आणि त्यांच्या अखंड पाठिंब्यामुळे या मालिकेने नुकताच ६०० भागांचा टप्पा पार केला आहे.

टॅग्स :तुझ्यात जीव रंगलाझी मराठी