टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली केवळ मैदानावरील खेळीसाठीच नव्हे, तर त्याच्या आवडीनिवडींसाठीही चर्चेत असतो. सध्या त्याचं आवडतं गाणं यूट्यूबवर तुफान गाजत आहे. या खास गाण्याला यूट्यूबवर तब्बल १० कोटी ४ लाख ७ हजार २१० व्ह्यूज मिळाले आहेत. विराटला आवडतं असलेलं हे गाणं हॉलिवूडच्या एखाद्या गायकानं गायलेलं नाही किंवा ते बॉलिवूडचंही नाहीये. तर हे एक तमिळ गाणं आहे.
विराट कोहली याला आवडतं असलेल्या या गाण्याचं नाव "Nee Singam Dhan" असं आहे. हे एक Pathu Thala या तामिळ सिनेमातील आहे. विराट कोहलीने हे गाणं त्याचं सध्या आवडतं गाणं म्हणून सांगितलं. त्यानंतर सोशल मीडियावर या गाण्याची चांगलीच चर्चा रंगली. हे गाणं संगीतकार ए.आर. रहमान यांनी कंपोज केलं असून, प्रसिद्ध गायक सिड श्रीराम यांनी ते गायलं आहे. आरसीबीने शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये कोहलीनं याबद्दल सांगितलं होतं.
विराट कोहलीसारखा सुपरस्टार खेळाडू या गाण्याचा चाहता असल्याचं समजल्यावर या गाण्याची लोकप्रियता अधिकच वाढली आहे. त यूट्यूबवरदेखील या गाण्याचे व्ह्यूज झपाट्याने वाढले आहेत. सध्या या गाण्याला यूट्यूबवर तब्बल १० कोटी ४ लाख ७ हजार २१० व्ह्यूज मिळाले आहेत. ही संख्या दररोज वाढतच आहे. विराट कोहलीचा संगीतप्रेमी स्वभाव अनेकांना माहीत आहे, पण तो तामिळ गाण्याचा इतका मोठा चाहता आहे, हे अनेकांसाठी आश्चर्याची गोष्ट ठरली.