तामिळनाडू विधानसभा निवडणूक २०२६ मध्ये ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर सुपरस्टार विजय आता मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या 'तमिळगा वेट्री कझगम' (TVK) पक्षाने १०८ जागा जिंकून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. या विजयाच्या जल्लोषातच थलपती विजयबद्दल आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. यापुढे 'थलपती' हा टॅग न वापरता विजय नावापुढे वेगळा टॅग वापरणार असल्याची चर्चा आहे. जाणून घ्या सविस्तर
विजयच्या आगामी 'जन नायकन' चित्रपटाच्या टायटल कार्डमध्ये त्याची थलपती नाही तर 'मुख्यमंत्री' म्हणून ओळख करण्यात आली आहे. या व्हायरल क्लिपमध्ये विजयच्या एन्ट्रीच्या वेळी स्क्रीनवर 'Tamil Nadu Chief Minister - C Joseph Vijay' असे लिहिलेले दिसत आहे. हे पाहून चित्रपटगृहात चाहत्यांनी एकच जल्लोष केला. मात्र, या टायटल कार्डमध्ये विजयच्या नावापुढे नेहमीप्रमाणे 'थलपती' (Thalapathy) ही पदवी न लावता थेट 'मुख्यमंत्री' लिहिल्यामुळे अनेक चाहते थक्क झाले आहेत.
विजयने नेहमीच आपले राजकीय आणि फिल्मी करिअर वेगळे ठेवले होते, मात्र शेवटच्या चित्रपटात 'तामिळनाडू राज्याचा मुख्यमंत्री' अशी त्याची ओळख केल्याने चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
'थलपती' टॅगचा रंजक इतिहास
विजयच्या नावामागे लागणारा 'थलपती' हा शब्द तमिळ भाषेत 'कमांडर' किंवा 'नेता' या अर्थाने वापरला जातो. त्याच्या चित्रपटांमधील दमदार भूमिका आणि नेतृत्वगुणांमुळे चाहत्यांनी त्याला हे टोपणनाव दिले होते. कालांतराने हे नाव त्याची एक स्वतंत्र ओळख बनले. राजकीय प्रवासातही त्याचे चाहते त्याला याच नावाने हाक मारतात, त्यामुळे टायटल कार्डमधून 'थलपती' हे नाव गायब असणे सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.
'जन नायकन' चित्रपटाची निर्मिती केव्हीएन प्रॉडक्शन्सची असून या राजकीय अॅक्शन ड्रामा चित्रपटाचे दिग्दर्शन एच. विनोद यांनी केले आहे. या चित्रपटात विजयसोबत पूजा हेगडे, मामिता बैजू आणि बॉबी देओल हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. प्रसिद्ध संगीतकार अनिरुद्धने या चित्रपटाला संगीत दिले आहे. सध्या विजयच्या या शेवटच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
Web Summary : Vijay's 'Jan Nayakan' movie shows him as 'Chief Minister,' sparking debate. After his party's election win, fans wonder about his future role.
Web Summary : विजय की 'जन नायकन' फिल्म में उन्हें 'मुख्यमंत्री' के रूप में दिखाया गया, जिससे बहस छिड़ गई। पार्टी की चुनावी जीत के बाद, प्रशंसक उनकी भूमिका को लेकर उत्सुक हैं।