Join us
Daily Top 2Weekly Top 5

विजय-रश्मिकाच्या लग्नात 'या' लोकांचा समावेश, समोर आली यादी; दोन पद्धतीने होणार विवाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 18:31 IST

विजय-रश्मिका पती पत्नीच्या रुपात उद्या सर्वांसमोर येणार, चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण

मनोरंजनविश्वात सध्या एका लग्नसोहळ्याची जोरदार चर्चा आहे. ते म्हणजे विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना. उद्या दोघंही आयुष्यभराची गाठ बांधणार आहेत. आजपर्यंत दोघांनी जगापासून एकमेकांचं प्रेम लपवायचा प्रयत्न केला. पण उद्या दोघंही पती-पत्नी म्हणून समोर येणार आहेत. उदयपूरमधील एका पॅलेसमध्ये हा शाही विवाह सोहळा पार पडणार आहे. आता त्यांच्या लग्नाचा शुभ मुहुर्त कधी आहे हेही समोर आलं आहे.

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांचे प्री वेडिंग फंक्शन दोन दिवसांपासून सुरु आहेत. त्याची छोटी झलकही सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. दोघांचं लग्न उद्या सकाळच्या सुमारास होणार की संध्याकाळी होणार असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. आज रश्मिकाची मेहंदी आणि दोघांच्या हळदीचा समारोह आहे. यात त्यांचे जवळचे मित्रमंडळी आणि नातेवाईक सामील होणार आहेत. तर त्यांच्या लग्नाचा मुहुर्त सकाळी ८ चा आहे. हे लग्न तेलुगू आणि कोडावा रितीरिवाजाप्रमाणे होणार आहे.

विजय रश्मिकाच्या लग्नात जवळचेच लोक सहभागी होणार आहेत. यामध्ये दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांचाही समावेश आहे. शिवाय राहुल रवींद्रन, ईशा रब्बा, आशिका रंगनाथ, स्टायलिस्ट श्रव्या शर्मा यांचाही समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहित विजय-रश्मिकाला आशीर्वाद दिला आहे.

टॅग्स :विजय देवरकोंडारश्मिका मंदानाTollywood