रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरात सुरू आहेत. गेल्या काही वर्षांपासून दोघं रिलेशनशिपमध्ये आहेत. यंदा दोघांनी एकत्र रोममध्ये नवीन वर्षाचं स्वागत केलं. तेव्हा विजयने रश्मिकाची झलक दिसणारा फोटोही पोस्ट केला. इतकंच नाही तर दोघं पहिल्यांदाच एकत्र विमानतळावर आले. तर आता या जोडीच्या लग्नाची पत्रिका आणि ठिकाणाबाबतचे व्हिडिओ व्हायरल झाले असून हे कपल या महिन्यातच म्हणजे फेब्रुवारीमध्ये लग्नगाठ बांधणार आहे.
प्री वेडिंग फंक्शन्स कधी होणार?
मीडिया रिपोर्टनुसार, विजय आणि रश्मिका हे कपल २६ फेब्रुवारी २०२६ रोजी राजस्थानमधील उदयपूर येथे एका शाही महालात विवाहबंधनात अडकणार आहे. या सोहळ्यासाठी अत्यंत मोजक्या पाहुण्यांना आणि कुटुंबातील सदस्यांनाच आमंत्रित करण्यात आले आहे. लग्नाआधीचे विधी २४ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, पहिल्या दिवशी संगीत आणि मेहंदीचा कार्यक्रम पार पडेल.
लग्नाला कोण उपस्थित राहणार?
उदयपूरमधील या मुख्य सोहळ्यासाठी तेलगू किंवा हिंदी चित्रपटसृष्टीतील कोणत्याही बड्या सेलिब्रिटीला निमंत्रण देण्यात आलेले नाही. मात्र लग्नानंतर हैदराबाद आणि मुंबईमध्ये दोन भव्य रिसेप्शन पार्ट्यांचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे. २५ फेब्रुवारीला पुन्हा एकदा मेहंदीचा विशेष कार्यक्रम होईल आणि त्यानंतर २६ तारखेला हे जोडपे अधिकृतपणे पती-पत्नी होतील.
काही दिवसांपूर्वी विजय देवरकोंडाच्या घराचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये त्याचे संपूर्ण घर दिव्यांनी उजळून निघाले होते. जरी या दोघांनी अद्याप आपल्या लग्नाबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नसली,तरी ऑक्टोबर २०२५ मध्ये त्यांचा साखरपुडा झाल्याची चर्चा होती. आता चाहत्यांना केवळ त्यांच्याकडून अधिकृत आनंदाची बातमी मिळण्याची प्रतीक्षा आहे.
Web Summary : Vijay Deverakonda and Rashmika Mandanna are reportedly marrying on February 26, 2026, in Udaipur. Pre-wedding festivities begin on February 24 with music and Mehndi. A reception is expected in Hyderabad and Mumbai after the wedding. Official announcement awaited.
Web Summary : विजय देवरकोंडा और रश्मिका मंदाना कथित तौर पर 26 फरवरी, 2026 को उदयपुर में शादी कर रहे हैं। प्री-वेडिंग उत्सव 24 फरवरी को संगीत और मेहंदी के साथ शुरू होगा। शादी के बाद हैदराबाद और मुंबई में रिसेप्शन की उम्मीद है। आधिकारिक घोषणा का इंतजार है।