Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाला बोलावलं नाही म्हणून चाहती रुसली! विजय-रश्मिकाने 'त्या' चिमुकल्या चाहतीसाठी केलं असं काही...; होतंय कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 13:58 IST

लग्नाला न बोलावल्यानं चाहती झाली नाराज!विजय-रश्मिकाने 'त्या' चिमुकलीचा घरी बोलावून केलं 'असं' स्वागत, होतंय कौतुक

Rashmika Mandanna And Vijay Deverkonda: दीपिका पादुकोण- रणवीर सिंग, विराट कोहली-अनुष्का शर्मा, रितेश देशमुख-जिनिलीया देशमुख तसचं रणबीर-आलिया ही मनोरंजन जगतातली लोकप्रिय सेलिब्रिटी जोडपी आहेत. आता या यादीत आणखी एका कपलचं नाव सामील झालं आहे. हे जोडपं म्हणजे विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना. अलिकडेच १६ फेब्रुवारीला रश्मिका-विजयने लग्नगाठ बांधून आयुष्याची नवी सुरुवात केली. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.एकीकडे सगळ्या चाहत्यांना आनंद झाला असतानाच रश्मिका-विजयच्या एका चिमुकल्या चाहतीने लग्नाला बोलावलं नसल्याची गोड तक्रार केली होती. त्या चिमुकल्या चाहतीला या दोघांनी आता घरी बोलावून खास आदरातिथ्य केलं आहे.

विजय आणि रश्मिकाने त्यांच्या आनंदात फक्त कुटुंबिय, मित्र मंडळी यांनाच नव्हे तर चाहत्यांनाही सहभागी करून घेतलं होतं.मात्र, त्यांच्या लग्नाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका चिमुकल्या चाहतीनं एक व्हिडिओ शेअर करत रश्मिका आणि विजय यांच्याकडे गोड तक्रार केली होती.विजय आणि रश्मिका यांनी नुकतंच या लहान चाहतीला त्यांच्या घरी आमंत्रित केलं, तिचं प्रेमानं स्वागत केलं आणि तिला स्वतःच्या हातांनी जेवण सुद्धा वाढलं. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

हा खास व्हिडीओ त्या चिमुकलीच्या सोशल मिडिया अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. दरम्यान, या व्हिडीओमध्ये ती चिमुकली घरी आल्यानंतर तिला उचलून घेताना दिसतोय. त्यानंतर ती चिमुकली त्यांना विचारते, लग्नात पाहुण्यांच्या यादीत माझं नाव का नव्हतं. तिचा तो भाबडा प्रश्न ऐकून विजय-रश्मिका हसू लागतात. या चिमुकल्या चाहतीचं जेवण झाल्यानंतर रश्मिका-विजय तिला संपूर्ण घर फिरवतात.तिच्याशी आपुलकीने  संवाद साधतात. रश्मिका आणि विजयच्या या कृतीनं चाहत्यांची पुन्हा एकदा मनं जिंकली आहेत. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून चाहत्यांनी या व्हिडीओवर तुफान लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Vijay-Rashmika host young fan who complained about wedding invite snub.

Web Summary : Vijay Deverakonda and Rashmika Mandanna invited a young fan who playfully complained about not being invited to their wedding. They hosted her warmly, personally served her food, and gave her a tour of their home, winning hearts.
टॅग्स :विजय देवरकोंडारश्मिका मंदानासेलिब्रिटीसोशल मीडियाव्हायरल व्हिडिओ