Join us
Daily Top 2Weekly Top 5

बजेटपेक्षा २३ पटीने जास्त कमाई करणारा चित्रपट! बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर ओटीटीवर होणार रिलीज, कुठे बघाल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 16:10 IST

ना मोठी स्टारकास्ट,ना बिग बजेट! बॉक्स ऑफिसवर सरस ठरला हा सिनेमा, आता या ओटीटी प्लॅटफॉर्म गाजवायला सज्ज

Tollywood Cinema: सिनेमागृहात दर आठवड्याला वेगवेगळ्या कथानाकांवर आधारित चित्रपट रिलीज होत असतात. त्यातील काही चित्रपट हे बॉक्स ऑफिसवर ब्लॉबस्टर ठरतात. २०२६ मध्ये, चित्रपटगृहांमध्ये फक्त 'धुरंधर २' या सिनेमाचा दबदबा पाहायला मिळाला. मात्र, याच दरम्यान,  थिएटरमध्ये एक  मल्याळम चित्रपट रिलीज झाला आणि कोणत्याही गाजावाजा न करता या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली. अवघ्या १० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाने बजेटच्या २३ पट अधिक कमाई केली.

दरम्यान, एकीकडे इंडियन  बॉक्स ऑफिसवर ‘धुरंधर २’च्या जोरदार क्रेझ असताना थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाने २३३.६३ कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.'वाझा २' हा एका मळ्यालम कॉमे़डी ड्रामा चित्रपट आहे.  हा चित्रपट २ एप्रिल २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर हा सिनेमा आता ओटीटी प्रदर्शनास सज्ज झाला आहे.

कथानक 

'वाझा २'सिनेमाच्या कथानकाबद्दल बोलायचं झालं तर  या सुपरहिट कॉमेडी चित्रपटात चार मित्रांची गोष्ट दाखवण्यात आली आहे. लूझर आणि  बॅक बेंचर म्हणून हिणवल्या गेलेल्या या मित्रांचा स्वतला सिद्ध करण्याचा हा प्रवास आहे. विशेष म्हणजे कोणताही मोठा स्टार नाही तसेच कमी बजेट असूनही हा सिनेमा कमाईच्या बाबतीत सरस ठरला.

विपिन दास दिग्दर्शित या चित्रपटात हशीर, ॲलन, विनायक, अजिन, बिजू कुट्टन, अल्फोन्स पुथरेन, विजय बाबू, अजू वर्गीस अमीन आणि एंजल मारिया यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या ८ मे रोजी जिओ हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल. इतकंच नाहीतर या चित्रपटाला आयएमडीबीवर ८.३  रेटिंग मिळाले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Malayalam Film 'Vaazha 2' Earns Big, Heads to OTT!

Web Summary : Malayalam comedy 'Vaazha 2', made on a small budget, became a blockbuster, earning 23 times its cost. The story of four friends overcoming challenges releases on Jio Hotstar on May 8th.
टॅग्स :Tollywoodसिनेमा