सध्या बॉक्स ऑफिसवर मोठ्या बजेटच्या चित्रपटांबरोबरच कमी बजेटच्या सिनेमांचाही दबदबा पाहायला मिळत आहे. रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेल्या 'धुरंधर: द रिव्हेंज'च्या वादळातही एका चित्रपटानं जबरदस्त कमाई करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या चित्रपटाचे नाव आहे 'वाझा २' (Vazha 2).
'वाझा २' हा मुळात एक मल्याळम विनोदी चित्रपट आहे. अत्यंत माफक अशा १० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने प्रदर्शनानंतर अवघ्या १३ दिवसांत जगभरातून १७६ कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला. विशेष म्हणजे, या चित्रपटाने आपल्या निर्मिती खर्चाच्या सुमारे १८ पट अधिक कमाई केली असून, याचा 'रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट' (Return on Investment) ७०० टक्क्यांहून अधिक आहे.
'धुरंधर: द रिव्हेंज' हा चित्रपट कमाईच्या बाबतीत मोठा ब्लॉकबस्टर ठरला आहे. भारतातील कमाई १ हजार कोटी, तर जगभरात १७०० कोटी पार गेली आहे. मात्र, बजेटच्या तुलनेत नफा (ROI) पाहता 'वाझा २'ने 'धुरंधर: द रिव्हेंज'ला मागे टाकलं आहे. 'धुरंधर: द रिव्हेंज'चा ROI अंदाजे ३००-४००% दरम्यान असल्याचं म्हटलं जातं.
'वाझा ३' येणार?'वाझा २' ला मिळालेला हा प्रचंड प्रतिसाद पाहून प्रेक्षक आता याच्या पुढच्या भागाची वाट पाहत आहेत. या यशाचा आनंद व्यक्त करताना निर्माते विपिन दास यांनी 'वाझा ३'चे संकेत दिले आहेत. त्यामुळे आगामी काळात या मल्याळम फ्रँचायझीची क्रेझ अधिकच वाढणार असल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, 'वाझा २'चे ओटीटी हक्क जिओ हॉटस्टारनं विकत घेतले आहेत. त्यामुळे मे महिन्याच्या अखेरपर्यंत हा चित्रपट तुम्ही ओटीटीवर घरबसल्या पाहू शकला.
Web Summary : Malayalam film 'Vazha 2,' made on a budget of ₹10 crore, earned ₹176 crore in 13 days, surpassing 'Dhurandhar' in ROI. 'Vazha 3' is hinted at, with OTT rights acquired by Jio Hotstar.
Web Summary : मलयालम फिल्म 'वाझा 2', जो ₹10 करोड़ के बजट में बनी, ने 13 दिनों में ₹176 करोड़ कमाए, ROI में 'धुरंधर' को पीछे छोड़ा। 'वाझा 3' का संकेत, Jio Hotstar द्वारा OTT अधिकार खरीदे गए।