Toxic A Fairy Tale For Grown Ups Teaser Release : आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने कन्नड सुपरस्टार यशनं चाहत्यांना सर्वात सरप्राईज दिलं आहे. त्याच्या आगामी 'टॉक्सिक: अ फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स' या चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित झाला आहे. टीझरमधील यशचा अवतार त्याच्या आजवरच्या सर्वात प्रभावी आणि दमदार भूमिकांपैकी एक मानला जातोय.
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका गीतू मोहनदास यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. टीझरची सुरुवात एका स्मशानभूमीतील दृश्याने होते, जिथे लोक शोक व्यक्त करत आहेत. पण, यशच्या एन्ट्रीने टीझरचा नूर पूर्णपणे बदलतो. जबरदस्त धमाके आणि यशचा पॉवरफुल लूक प्रेक्षकांना थक्क करणारा आहे. यशचा स्वॅग, अॅक्शन पाहून चाहते खूश झालेत.
हॉलिवूड दर्जाचा थरार
'टॉक्सिक'ला जागतिक स्तरावर नेण्यासाठी निर्मात्यांनी हॉलिवूडमधील दिग्गजांची फौज उभी केली आहे. या चित्रपटातील अॅक्शन कोरिओग्राफी 'जॉन विक: चॅप्टर २' आणि 'आयर्न मॅन' फेम जे.जे. पेरी यांनी केली आहे. तर 'ड्यून: पार्ट २' साठी काम केलेल्या बाफ्टा-विजेत्या DNEG या कंपनीने व्हिज्युअल इफेक्ट्सची धुरा सांभाळली आहे.
'टॉक्सिक'ची तगडी स्टारकास्ट'टॉक्सिक'मध्ये भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार एकत्र दिसणार आहेत. रुक्मिणी वसंत, नयनतारा, कियारा अडवाणी, हुमा कुरेशी, तारा सुतारिया या अभिनेत्रीदेखील या चित्रपटात दिसतील. हा चित्रपट इंग्रजी तसेच भारताच्या वेगवेगळ्या भाषांत डब केला जाईल. त्यामुळेच हा चित्रपट फक्त पॅन इंडिया नव्हे तर पॅन वर्ल्ड ठरणार आहे. हा चित्रपट १९ मार्च २०२६ रोजी जगभर प्रदर्शित होणार आहे.
Web Summary : Kannada superstar Yash's 'Toxic' teaser is out, promising a powerful performance. Directed by Geetu Mohandas, it features Hollywood-level action choreography and visual effects. The film boasts a stellar cast and will release globally on March 19, 2026.
Web Summary : कन्नड़ सुपरस्टार यश की 'टॉक्सिक' का टीज़र जारी, दमदार प्रदर्शन का वादा। गीतू मोहनदास द्वारा निर्देशित, इसमें हॉलीवुड-स्तरीय एक्शन कोरियोग्राफी और वीएफएक्स हैं। फिल्म में शानदार कलाकार हैं और यह 19 मार्च, 2026 को विश्व स्तर पर रिलीज होगी।