Join us

"हे तर सर्वांनाच...", रश्मिकाने विजयसोबतच्या एंगेजमेंटच्या वृत्ताला दिला दुजोरा? फेब्रुवारीत घेणार सातफेरे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 13:28 IST

Rashmika Mandanna And Vijay Deverakonda : साउथ सिनेमातील लोकप्रिय जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाच्या अफवा बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत.

साउथ सिनेमातील लोकप्रिय जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाच्या अफवा बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. मागील काही दिवसांपूर्वी एक बातमी समोर आली होती की दोघांनी गुपचूप साखरपुडा केला आहे. मात्र, यावर दोघांनीही अधिकृतपणे मौन बाळगले आहे. पण, अद्याप अफवा सुरूच आहे. नुकत्याच एका कार्यक्रमात पोहोचलेल्या रश्मिका मंदानानेविजय देवरकोंडासोबतच्या एंगेजमेंटवर काहीतरी असे सांगितले, ज्यामुळे लोकांना वाटू लागले आहे की या दोघांमध्ये लवकरच खास नाते जुळणार आहे.

रश्मिका मंदाना नुकतीच तिच्या 'थम्मा' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचली होती. जिथे एका मुलाखतीत साखरपुड्याबद्दल प्रश्न विचारल्यावर तिने हसून जे उत्तर दिले, त्यानंतर लोकांचा संशय विश्वासात बदलला. तेलगू ३६०ला दिलेल्या एका मुलाखतीत साखरपुड्याबद्दल प्रश्न विचारल्यावर तिने हसून उत्तर दिले, 'याबद्दल सगळ्यांना माहीत आहे...' तिचे हे उत्तर सोशल मीडियावर लगेच व्हायरल झाले आणि हा तिच्या साखरपुड्याच्या पुष्टीकरणाचा मोठा संकेत मानला जात आहे.

रश्मिकाचा व्हिडीओ झाला व्हायरल

यापूर्वी, रश्मिकाच्या दुसरा चित्रपट 'द गर्लफ्रेंड'च्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात प्रसिद्ध निर्माता अल्लू अरविंद यांनीही तिला चिडवताना विनोद केला होता की विजय देवरकोंडा चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात नक्कीच येईल. या गोष्टीवर रश्मिकाचे लाजून हसणे प्रेक्षक आणि माध्यमांच्या नजरेतून सुटले नाही. या सगळ्यादरम्यान, गलट्टा प्लसला दिलेल्या एका मुलाखतीचा एक क्लिप देखील खूप व्हायरल झाली, जिथे होस्टने अचानक रश्मिकाला अभिनंदन केले. रश्मिका चकीत आणि गोंधळलेली असताना होस्टने स्पष्ट केले की अभिनंदन तिच्या नवीन परफ्यूम लॉन्चसाठी आहे, पण नंतर विचारले, 'किंवा आणखी काही आहे?' यावर लगेचच गडबडून रश्मिका म्हणाली, ''नाही, नाही...'' पण नंतर लगेच हसत म्हणाली की, ''खरं तर, आजकाल खूप काही चालू आहे, म्हणून मी तुमच्या अभिनंदनाचा स्वीकार त्या सर्व गोष्टींसाठी करते.''

काय आहे प्रकरण?रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा ही जोडी 'गीता गोविंदम' (२०१८) आणि 'डियर कॉमरेड' (२०१९) चित्रपटात पाहायला मिळाली. या चित्रपटातून त्यांनी रसिकांच्या मनात घर केले. ऑफस्क्रीन त्यांची मैत्री आणि केमिस्ट्री खूप चर्चेत राहिली आहे. नुकत्याच, मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता की, या दोघांनी याच महिन्यात गुपचूप साखरपुडा केला आहे. जेव्हा दोघे मॅचिंग रिंग्स घालून दिसले तेव्हा या गोष्टीला आणखी दुजोरा मिळाला. रश्मिकाची डायमंड रिंग आणि विजयची साधी प्लॅटिनम बँड. हे जोडपे पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये एका खासगी लग्नाचे नियोजन करत असल्याचे बोलले जात आहे, ज्यात फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यच सामील असतील.

टॅग्स :रश्मिका मंदानाविजय देवरकोंडा