Join us

'पुष्पा २' फेम अभिनेत्रीने शेअर केला कास्टिंग काउचचा अनुभव, म्हणाली - "३ मिनिटात...."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2024 16:53 IST

Pushpa 2 : 'पुष्पा २' फेम अभिनेत्रीने तिला आलेला कास्टिंग काउचचा अनुभव शेअर केला आहे.

अल्लू अर्जुन (Allu Arjun) स्टारर 'पुष्पा २' (Pushpa 2) चित्रपटाची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. 'पुष्पा २'मधील पहिले गाणं 'पुष्पा पुष्पा' समोर आल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. पुष्पा २च्या एक्साइटमेंट दरम्यान अभिनेत्रीने तिला आलेला कास्टिंग काउचचा अनुभव शेअर केला आहे. पुष्पाच्या पहिल्या भागात झळकलेली अनसूया भारद्वाजने एका मुलाखतीत कास्टिंग काउचचा सामना कशी करते, याबद्दल सांगितले.

अभिनेत्री अनसूया भारद्वाजने नुकतेच एका मुलाखतीत सांगितले की,करिअरच्या सुरूवातीला कित्येक अभिनेत्रींना कास्टिंग काउचचा सामना करावा लागतो आणि तिलादेखील याचा सामना करावा लागला आहे. तिने सांगितले की, ती समोरच्या व्यक्तीचा हेतू ३ मिनिटांच्या बोलण्यातून बदलून टाकते. अशावेळी आपल्या कुटुंबाबद्दल बोलणे एक ट्रिक आहे. 

अनसूया तिच्या मुलाखतीत म्हणाली की, जेव्हा तिला समजते की लोक असे काही बोलत आहेत, तेव्हा ती लगेच विषय बदलते. आणि पती आणि मुलांबद्दल बोलू लागते. अनसूयाने तिच्या मुलाखतीत खुलासा केला की, इंडस्ट्रीत टिकून राहण्यासाठी प्रत्येकाशी संबंध तटस्थ ठेवावे लागतात, जेणेकरून भविष्यात काम मिळणे सोपे होईल.

वर्कफ्रंटअनसूयाने लोकप्रिय टेलिव्हिजन मालिकांमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. तिने कित्येक वर्षे अँकरिंग केल्यानंतर सिने कारकीर्दीला सुरूवात केली. तिने तेलुगू सिनेमा Soggade Chinni Nayanaमध्ये नागार्जुनसोबत आयटम साँग केले होते. ती पुष्पामध्ये झळकली असून पुष्पा २मध्येही दिसणार आहे.

टॅग्स :पुष्पा