Join us
Daily Top 2Weekly Top 5

६० घरं, १०० पाण्याचे टँकर अन्...; उगाच हिट होत नाहीत साऊथ सिनेमे, फक्त एका गाण्यासाठी २.५ एकरचा सेट, कोट्यवधींचा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 15:31 IST

‘द पॅराडाइज’ सिनेमातीली 'आया शेर' हे  गाणं यावर्षीच्या सर्वात मोठ्या हिट्सपैकी एक ठरलं आहे. पण गाण्यातून ती भव्यता दाखवण्यासाठी भव्य सेटही उभारण्यात आला होता. 'आया शेर' गाण्याच्या सेटची गोष्ट जाणून घेऊयात. 

‘द पॅराडाइज’ सिनेमातीली 'आया शेर' हे  गाणं यावर्षीच्या सर्वात मोठ्या हिट्सपैकी एक ठरलं आहे. अनेक भाषांमध्ये या गाण्याने मिलियन्स व्ह्यूज मिळवले असून इंस्टाग्राम रील्सही व्हायरल होत आहेत. या गाण्याने आपल्या जबरदस्त एनर्जी आणि भव्य व्हिज्युअल्समुळे प्रेक्षकांना प्रभावित केले आहे. पण गाण्यातून ती भव्यता दाखवण्यासाठी भव्य सेटही उभारण्यात आला होता. 'आया शेर' गाण्याच्या सेटची गोष्ट जाणून घेऊयात. 

'आया शेर' गाण्यासाठी एक भव्य ‘स्लम एम्पायर’चा सेट उभारण्यात आला होता. ज्यामध्ये हिरोला स्लमचा सम्राट म्हणून दाखवण्यात आलं आहे.  सर्वात खास सेटअप्सपैकी एक म्हणजे ‘हिरो हाउस’ (कमांड सेट) जो हिरोच्या दमदार डिप (dip) सीनसाठी तयार करण्यात आला होता. ६० फूट रुंद, ४५ फूट उंच आणि २५ फूट खोल असा हा सेट होता. सुरुवातीला हा सेट ३० फूट रुंद बनवण्यात आला होता. पण नंतर दोन्ही बाजूंना १५-१५ फूट वाढवून त्याची रुंदी ६० फूट करण्यात आली. सुमारे २५ कामगारांनी २० दिवसांच्या मेहनतीने हा भव्य स्ट्रक्चर उभारला. याला आसपासच्या वातावरणाशी जुळवून वास्तववादी दिसण्यासाठी विशेष ‘एजिंग’ (जुनं दिसण्यासाठी) तंत्राचा वापर करण्यात आला.

या गाण्यात आणखी एक वेगळी गोष्ट पाहायला मिळते, ती म्हणजे बिर्याणीच्या मोठ्या भांड्यासारखा स्ट्रक्चर. याला तांब्याचे (copper) फिनिश आणि जुना लुक देण्यात आला आहे. जेणेकरून तो अगदी खरा आणि देसी वाटेल. १० फूट रुंदी, २० फूट रेडियस आणि ६ फूट उंची असलेला हा सेट ५-७ जणांच्या टीमने फक्त पाच दिवसांत तयार केला.  प्रॉडक्शनचा स्तर अधिक भव्य करण्यासाठी २.५ एकरांवर ‘वॉटर बॉडी व्हिलेज सेट’ उभारण्यात आला. यात डमी स्ट्रक्चर्सऐवजी ६० खरी घरे बांधण्यात आली होती. सुमारे ५० कामगारांनी ३० दिवस मेहनत करून हे गाव उभारले. ज्याची रचना अशी केली होती की एकाच वेळी जवळपास ५०० लोक येथे उपस्थित राहू शकतील. पाण्याचा सीन तयार करण्यासाठी १०० टँकर पाणी आणण्यात आले, जे भरायला सात दिवस लागले. याशिवाय पाणी साठवण्यासाठी २० फूट खोल असा वेगळा तलावही तयार करण्यात आला होता.

प्रॉडक्शनने एक मोठा ‘डंप यार्ड’ सेटही उभारला. जो १२० फूट लांब, ५० फूट रुंद आणि ३० फूट उंच होता. २५ जणांच्या टीमने ३० दिवसांच्या मेहनतीने हा सेट तयार केला. त्याचा उद्देश खऱ्या डंप यार्डसारखा ‘रस्टिक’ आणि जुना लुक देणे हा होता. या सेट्सची सर्वात मोठी खासियत म्हणजे ते नैसर्गिक वातावरणाला कोणतीही हानी न पोहोचवता उभारण्यात आले. आर्ट डिपार्टमेंटने अत्यंत काळजीपूर्वक हे स्ट्रक्चर्स त्या ठिकाणच्या जमिनी आणि परिसराशी जुळवून घेतले. वास्तवता दाखवण्यासाठी नैसर्गिक टेक्सचर्स आणि ‘एजिंग’ (जुनं दाखवण्याची) तंत्रे मोठ्या प्रमाणात वापरण्यात आली. प्रत्येक सेटअपची योजना अत्यंत बारकाईने करण्यात आली होती, जेणेकरून काम कोणत्याही अडथळ्याशिवाय आणि क्रिएटिव्ह पद्धतीने पूर्ण होऊ शकेल. सर्व आवश्यक परवानग्या घेतल्यानंतरच अंतिम बांधकाम करण्यात आले. याचा परिणाम म्हणजे ‘आया शेर’ गाण्यात दिसणारे भव्य व्हिज्युअल्स, जे प्रेक्षकांना त्या दमदार आणि भव्य जगाची झलक दाखवतात. 

‘द पॅराडाइज’चा टीझर रिलीज झाल्यापासून त्याबद्दलची उत्सुकता सतत वाढत आहे. प्रेक्षकांकडून याला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून काही वेळातच त्याने ऑनलाइन मिलियन्समध्ये व्ह्यूज मिळवले आहेत. या टीझरने सोशल मीडियावर मोठी चर्चा निर्माण केली असून चित्रपटाबद्दल लोकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. या वाढत्या क्रेझमुळे ‘द पॅराडाइज’ हा यावर्षीच्या सर्वाधिक प्रतीक्षित चित्रपटांपैकी एक बनला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : South films' grand sets: 'Aaya Sher' song cost crores.

Web Summary : The 'Aaya Sher' song from 'The Paradise' featured a massive slum empire set, including a 60-foot-wide hero house. A 2.5-acre water village with 60 real houses was built, requiring 100 water tankers. The teaser generated huge buzz.
टॅग्स :Tollywoodसेलिब्रिटी